एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आलेली ‘ही’ अभिनेत्री पतीसोबत करतेय १६० मुलांचा सांभाळ

लग्नानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलिवूडचा घेतला निरोप; तिच्या लग्नाला ३० वर्ष पूर्ण झाली असून आता पतीसोबत करते तब्बल १६० मुलांचा सांभाळ... नक्की काय आहे सत्य?

एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आलेली 'ही' अभिनेत्री पतीसोबत करतेय १६० मुलांचा सांभाळ
ayesha jhulka
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 9:32 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एका सिनेमात मुख्य भूमिका साकारली आणि एका रात्रीत चाहत्यांच्या मनात घर केलं. अशाच अभिनेत्रीं पैकी एक म्हणजे अभिनेत्री आयशा जुल्का (Ayesha Jhulka). आयशा जुल्का हिने अभिनेता सलमान खान याच्यासोबत ‘कुर्बान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर आयशा हिने अभिनेता आमिर खान स्टारर ‘जो जीता वही सिकंदर’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आणि एका रात्रीत स्टार झाली. पण आयशा जुल्का हिची लोकप्रियता अधिक काळ टिकून राहिली नाही. ‘दलाल’ सिनेमानंतर अभिनेत्रीला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. आयशा हिने २७ वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये ५२ सिनेमांमध्ये काम केलं. (ayesha jhulka movies)

रिपोर्टनुसार, आयशा जुल्का हिने ज्या सिनेमांमध्ये काम केलं, त्या सिनेमातील अभिनेत्याला डेट केलं. आयशा जुल्का हिचं नाव नाना पाटेकर, सलमान, मिथुन, अक्षय कुमार यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण कोणासोबतही नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर अभिनेत्रीने २००३ साली उद्योजक समीर वाशी (Sameer Vashi) यांच्यासोबत लग्न केलं आणि बॉलिवूडचा निरोप घेतला.

हे सुद्धा वाचा

आयशा आणि समीर यांच्या लग्नाला जवळपास ३० वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांना स्वतःचं बाळ नाही. अशात अनेकदा आयशा हिला फॅमिली प्लानिंगबद्दल विचारण्यात आलं. एका मुलाखतीत अभिनेत्रीने फॅमिली प्लानिंगबद्दल मोठा खुलासा केला. मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, तिला स्वतःचं मुल नाही पण अभिनेत्री तब्बल १६० मुलांचा सांभाळ करते. (ayesha jhulka father name)

आयशा म्हणाली, ‘मी माझ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. अनेक चढ-उतार पाहिले आहेत. स्वतःच्या मुलांबद्दल असलेला माझा निर्णय जेव्हा मी माझ्या पतीला सांगितला तेव्हा त्यांनी माझा निर्णय मान्य केला. लग्नानंतर मी आणि समीर याने गुजरात येथील दोन गाव दत्तक घेतली आहेत.’ (ayesha jhulka children)

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘गुजरात मधील दोन गावात असलेल्या १६० मुलांचा खाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च आम्ही दोघे मिळून करतो. मातृत्वाबद्दल बोलायचं झालं तर, मी १६० मुलांना मुंबईमध्ये आणू शकत नाही. त्यामुळे मी गावी जावून मातृत्वाचा आनंद घेते. स्वतःचं मुल न करण्याचा निर्णय आमच्या दोघांचा होता आणि आज आम्ही आनंदी आहोत.’ असं देखील आयशा म्हणाली. (ayesha jhulka net worth)

आपल्या एका मुलाखतीत आयशा जुल्काने बॉलिवूडपासून दूर जाण्याचे कारण सांगितलं. ‘व्यक्तीच्या जीवनात अशी वेळ येते, जेव्हा त्याला आपल्या जीवनाचा नेमका हेतू कळतो. मला आयुष्यात सेटल व्हायचंहो होतं. त्या काळात मला शूटिंगसाठी बर्‍याच शिफ्टमध्ये काम करावे लागत होतं. मी माझं वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन एकत्रितपणे सांभाळू शकले नाही, यामुळे मी अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. असं देखील अभिनेत्री म्हणाली.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.