Doctor G | रकुल प्रीतला लागली लॉटरी, आयुष्मान खुरानासोबत ‘या’ चित्रपटात दिसणार!

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana)  लवकरच डॉक्टर जी (Doctor G) या चित्रपटात दिसणार आहे.

Doctor G | रकुल प्रीतला लागली लॉटरी, आयुष्मान खुरानासोबत 'या' चित्रपटात दिसणार!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana)  लवकरच डॉक्टर जी (Doctor G) या चित्रपटात दिसणार आहे. अनुभूती कश्यप या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. जंगल पिक्चर्सने डिसेंबरमध्ये चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत रकुलप्रीत सिंह दिसणार असल्याचे बोलले जात आहे. पहिल्यांदा आयुष्मान आणि रकुल प्रीत सिंह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात आयुष्मान खुराना डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. (Ayushmann Khurrana And Rakul Preet Singh will be seen in the movie ‘Doctor G’)

आयुष्मान यावर म्हणाला होता की, मी माझ्या कारकीर्दीत पहिल्यांदाच डॉक्टरचा कोट घालणार आहे. यासह, मी या चित्रपटातून एक संदेश देखील देणार आहे. मी आशा करतो की, तुम्हाला ते आवडेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रकुलप्रीत सिंह म्हणाली की, “मी डॉक्टर जी या चित्रपटाचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी आयुष्मानसोबत पहिल्यांदा चित्रपटात काम करणार आहे.

मी जंगल पिक्चर्स आणि अनुभूती कश्यप यांची आभारी आहे. मला चित्रपटाची स्क्रिप्टही आवडली आहे. मी शुटिंग सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. “रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या आगामी‘थँक्स गॉड’(Thank God) चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अजय देवगन (Ajay Devgan), सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) दिसणार आहे. या चित्रपटासह रकुल प्रीत सिंह आणि अजय देवगन दुसऱ्यांदासोबत काम करताना दिसतील आणि अजय आणि सिद्धार्थ पहिल्यांदा एकत्र या चित्रपटात काम करणार आहेत.

थँक्स गॉड हा चित्रपट कॉमेडी आहे ज्यामधून प्रेक्षकांना खूप हासवण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा कुटुंबिक जीवनावर आधारित असणार आहे आणि हा चित्रपट घरातील सर्वजण एकत्र बसून पाहू शकतात.

संबंधित बातम्या : 

Budget 2021 | अर्थसंकल्पात बॉलिवूडला भोपळा, मनोरंजन क्षेत्र महागणार?

कंगना रनौतच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता, न्यायालयाने पाठवली नोटीस!

Vamika | विराट-अनुष्काच्या लेकीचं ‘वमिका’ नामकरण, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक!

(Ayushmann Khurrana And Rakul Preet Singh will be seen in the movie ‘Doctor G’)

Published On - 3:08 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI