आधीचे कारनामे कसे आहेत.. रामदेव बाबा भडकले, कंगना यांना दाखवला आरसा, थेट..
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगणा राणावत कायमच चर्चेत असतात. त्यामध्येच कंगणा राणावत यांनी जेनझी आंदोलनाबद्दल मोठे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर मोठी खळबळ उडाली. यावर आता रामदेव बाबा यांनी मोठे विधान केले.

खासदार कंगना राणावत यांच्याबद्दल बाबा रामदेव यांनी मोठे विधान केले. हेच नाही तर कंगना राणावतचे अगोदर काय होते काय नाही हे माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले. देशातील युवकांबद्दल असे विधान करणाऱ्यांना पार्टीने समज दिली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. बाबा रामदेव यांनी नाराजी जाहीर केली. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही म्हणतात की, जेनझींसोबत संवाद साधला पाहिजे, तर दुसरीकडे भाजपाच्या एक खासदार जेनझींना गटार छाप म्हणतात. यावर बाबा रामदेव यांनी म्हटले की, त्यांचे लहानपण कसे गेले, त्यांचे तारूण्य कसे गेले, त्यांचे पहिले कारनामे कसे राहिले, या लोकांवर मला भाष्य करायचे नाहीये. कोणत्याही देशातील युवकांना गटार बोलणे म्हणजे बिघडणाऱ्या डोक्याचे लक्षण आहे.
बाबा रामदेव यांनी भडकताना म्हटले की, कोणत्याही जाती, धर्माची गोष्ट आहे. युवक कोणती जात नाही. हे सर्व मुले आहेत. युवक मोठी ताकद आहेत. मुळात म्हणजे याला कोणीही नाकारू शकत नाही. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर कंगना राणावत यांनी प्रदर्शन करणाऱ्यांना गटार छाप म्हटले होते. हेच नाही तर यासोबतच त्यांच्या चारित्र्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केली होती.
यावरच आता बाबा रामदेव यांनी थेट कंगना राणावत यांच्या समाचार घेतला. हेच नाही तर बाबा रामदेव यांनी सरकारला मोठा इशारा देखील दिला. त्यांनी स्पष्ट म्हटले की, शिक्षण पद्धतीमध्ये काही बदल झाला नाही तर मी उपोषणाला बसेल. कंगना राणावत यांचे सर्व कारनामे माहिती असल्याचेही बाबा रामदेव यांनी म्हटले.
कंगणा राणावत बाबा रामदेव यांना नक्की काय उत्तर देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. जेनझींच्या आंदोलनादरम्यान कंगना राणावत आपले विचार मांडताना दिसल्या. यादरम्यान त्यांनी जेनझींबद्दल केलेल्या विधानानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. ज्यानंतर त्यांनी आपण सर्वांबद्दल हे विधान केले नसल्याचेही मोठे विधान केले. आता थेट रामदेव बाबा यांनी त्यांचा समाचार घेतला.