वांद्रे येथील प्रसिद्ध गेईटी गॅलेक्सी सिनेमागृह अखेर बंद, काय झाले नेमके ?
मुंबईतील चित्रपट रसिकांची मोठी निराशा करणारी बातमी समोर आली आहे. वांद्रे येथील ५० वर्षे जुने गॅलेक्सी थिएटर अखेर बंद करण्यात आले आहे.

अनेक सिनेमा रसिकांच्या आठवणीतील ५० वर्षांपूर्वीचे गेईटी गॅलेक्सी थिएटर आता बंद करण्याची नोटीस लावण्यात आली आहे. या गेईटी गॅलेक्सी सिनेमागृह पूर्वी एक पडदा सिनेमागृह होते. आता त्याचे ७ स्क्रीन मल्टीफ्लेक्स करण्यात आले होते. आता हे सिनेमागृह परवाना नूतनीकरण न केल्याने बंद करण्यात आल्याची नोटीस पोलिसांनी येथे चिकटवली आहे. त्यामुळे सिनेरसिक आणि कलाकारांत चिंता व्यक्त केली जात आहे.
या सिनेमागृहात अनेक लोकप्रिय सिनेमांचे प्रदर्शन झाले होते. वांद्रे येथील हे सिनेमागृह कर न भरल्याने बंद केल्याची नोटीस या सिनेमागृहावर चिकटवण्यात आली आहे. मुंबईतील अनेक जुनी चित्रपटगृहे एक पडदा ते मल्टीप्लेक्स झाली आणि तगून राहिली. मात्र, हे थिएटर मल्टीप्लेक्स होऊनही बंद पडल्याने आश्चर्यव्यक्त होत आहे. या सिनेमागृहाच्या संदर्भात इतर माहिती अजून पुढे आलेली नाही. वांद्रे येथील प्रसिद्ध ओपन कार थिएटरही अनेक वर्षांपूर्वीच बंद पडले होते.
गेईटी गॅलेक्सी थिएटर ९२ च्या दशकात मल्टीप्लेक्समध्ये परिवर्तित झाले होते. या सिनेमागृहातील स्थापत्य रचना जुन्या पद्धतीची परंतू आकर्षक अशी होती. एक पडदा सिनेमागृह असताना या सिनेमागृहात अनेक चित्रपट प्रदर्शित होऊन गाजले होत. नंतर हे सिनेमागृह मल्टीप्लेक्स होऊन यात सात स्क्रीनवर सिनेमा प्रदर्शित होत होता.त्यामुळे या थिएटरला जी-७ देखील म्हटले जात आहे. या सिनेमागृहावर लावण्यात आलेल्या नोटीसमध्ये पुढील आदेशापर्यंत गेईटी-गॅलेक्सी बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. तोपर्यंत येथील सिनेमाचे शो बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.
