AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू संस्कृती जगाला संतुलित दृष्टिकोन देऊ शकते, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं प्रतिपादन

लंडन येथील 'सेलिब्रेशन ऑफ वननेस' कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासावर भाष्य करत जागतिक ऐक्याचा संदेश दिला. आपलेपणा, निःस्वार्थ सेवा आणि विविधतेचा आदर हाच हिंदू संस्कृतीचा मूळ स्वभाव असल्याचे स्पष्ट केले.

हिंदू संस्कृती जगाला संतुलित दृष्टिकोन देऊ शकते, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं प्रतिपादन
हिंदू संस्कृती जगाला संतुलित दृष्टिकोन देऊ शकते, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं प्रतिपादनImage Credit source: Twitter
| Updated on: Sep 07, 2026 | 4:36 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लंडनमधील ‘सेलिब्रेशन ऑफ वननेस’ या कार्यक्रमात हजेरी लावली. संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासावर भाष्य करताना त्यांनी विविध जागतिक विषयांवर संघाची भूमिका स्पष्ट केली. “जग अधिक सुंदर आणि समृद्ध बनवायचे असेल, तर आपल्याला विभागणाऱ्या गोष्टींपेक्षा एकत्र आणणाऱ्या गोष्टींवर अधिक भर दिला पाहिजे.”, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.  ‘हिंदू स्वयंसेवक संघ’द्वारे आयोजित या कार्यक्रमाला 326 संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे 600 मान्यवर उपस्थित होते. काळाच्या कसोटीवर संघाने कोणते तत्त्व टिकवून ठेवले? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. मोहन भागवत म्हणाले, “ते तत्त्व म्हणजेच ‘आपलेपणा’. हिंदूचा मूळ स्वभावच व्यक्ती, समाज आणि संपूर्ण मानवजातीवर निःस्वार्थ प्रेम करण्याचा आहे. हिंदू संस्कृती जगाला एक संतुलित दृष्टिकोन देऊ शकते.”

डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले की,  हिंदू हा शब्द कोणत्याही विशिष्ट धार्मिक पद्धतीपुरता मर्यादित नाही. हिंदू हा एक स्वभाव आहे, जो सर्व प्रकारच्या विविधतेचा आदर करतो. विविध विचारसरणी आणि धार्मिक पद्धती या व्यापक हिंदू सांस्कृतिक चौकटीत एकत्र नांदू शकतात. भविष्यातील वाटचालीबाबत बोलताना सरसंघचालकांनी सांगितले की, सध्या संघात पाच पिढ्यांपासून काम सुरू आहे. सातव्या पिढीपूर्वी हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे, जेणेकरून हे काम पूर्ण होण्यास जास्त काळ लागणार नाही. सद्यस्थितीत लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत स्वयंसेवक सक्रिय असून राजकीय विरोधकही त्यांच्या सेवाकार्याचा आदर करतात, असंही ते सांगायला विसरले नाहीत.

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या निष्ठेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “एक सच्चा हिंदू असणे आणि ब्रिटनशी प्रामाणिक राहणे यात कोणत्याही संघर्षाचं कारण नाही. हिंदुत्वानुसार, तुमची निष्ठा तुमच्या कर्मभूमीशी असली पाहिजे.” तुमची निष्ठा तुमच्या ‘कर्मभूमी’शी असते. तुमची ‘जन्मभूमी’ आणि ‘पुण्यभूमी’ यातून तुम्हाला संस्कार मिळतात. त्या संस्कारांचे पालन तुम्हाला तुमच्या कर्मभूमीत करायचे असते आणि ज्या भूमीवर तुम्ही राहता, तिची सेवा करायची असते, असं मोहन भागवत म्हणाले. तरूणांना संदेश देताना भागवत यांनी पुढे सांगितले की, सेवा ही कोणत्याही उपकाराच्या किंवा दयेच्या भावनेतून न करता निःस्वार्थपणे केली पाहिजे.

या कार्यक्रमाची सुरुवात नेपाळमधील पूरग्रस्तांना श्रद्धांजली वाहून शांततेत करण्यात आली. या प्रसंगी ‘सेवा युके’ तर्फे नेपाळमधील मदतकार्यासाठी 1 लाख पाउंडचा मदत देण्यात आली.या कार्यक्रमाला ब्रिटनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य, खासदार, महापौर आणि भारताचे उच्चायुक्त पेरियासामी कुमारन यांच्यासह  इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. भागवत यांनी आपल्या लंडन दौऱ्यात विविध धर्मगुरू, शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंतांचीही भेट घेतली.

Follow Us
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप