Samantha Akkineni : ‘द फॅमिली मॅन’मधील सामंथा अक्किनेनीचा दमदार अभिनय पाहण्याआधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

VN

VN |

Updated on: Jun 02, 2021 | 5:02 PM

‘द फॅमिली मॅन’मधील समांथाच्या डिजिटल पदार्पणात ती पूर्णपणे नवीन अवतारात पहायला मिळेल. (Before watching Samantha Akkineni's energetic performance in 'The Family Man', know 'these' things!)

Samantha Akkineni : ‘द फॅमिली मॅन’मधील सामंथा अक्किनेनीचा दमदार अभिनय पाहण्याआधी जाणून घ्या 'या' गोष्टी!

मुंबई : समांथा अक्किनेनी (Samantha Akkineni) ही तमिळ आणि तेलुगू चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रस्थापित अभिनेत्री आहे. आपली सुंदरता, उत्कृष्ट अभिनय कौशल्य, स्क्रीन प्रेजेन्स आणि  प्रतिभा यामुळे तिनं दक्षिणेत प्रत्येकाची मनं जिंकली आहेत. आता, मुख्य प्रवाहातील ‘द फॅमिली मॅन’च्या नव्या सीझनमध्ये ती आपला डिजिटल डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. नव्या सीझनमध्ये श्रीकांत तिवारीचा सूड घेणारी राजीची भूमिका साकारणारी समांथा अक्किनेनीशी संबंधित 5 मनोरंजक तथ्यं

वास्तव आयुष्यातील मानवतावादी दृष्टीकोन समांथा एक उत्कृष्ट कलाकार असण्यासोबतच एक एनजीओ देखील चालवते ज्याची सुरुवात तिनं 2012मध्ये केली होती. ही एक स्वयंसेवी संस्था असून स्त्रिया आणि लहान मुलांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. समंथाचा मानवतेवर विश्वास असून समाजाला उत्तम बनवण्यासाठी ती कार्य करत आहे. ती आपली संस्था चालवण्यासोबतच स्त्रिया आणि मुलांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या अन्य स्वयंसेवी संस्थांना देखील मदत करते. यासोबतच, रस्त्यावरील भटक्या जनावरांसाठी काम करणाऱ्या एनजीओंना देखील सहकार्य करते.

शिकण्याची आवड आणि भूमिकेत 100% देण्यासाठी उत्साही ‘द फॅमिली मॅन’मधील नव्या सीजनमध्ये समांथा सादर करत असलेल्या व्यक्तिरेखेचे नाव राजी आहे. जी श्रीकांतची प्रतिद्वंद्वी असून एका गारमेंट फॅक्ट्रीमध्ये काम करते. भूमिकेला यथासंभव वास्तववादी बनवण्यासाठी तिने एका खऱ्याखुऱ्या गारमेंट फॅक्ट्रीमध्ये शिवणकला शिकली असून आपली भूमिका निभावण्यासाठी तिथल्या कारागिरांची देखील मदत घेतली.

इंटेन्स फिजिकल ट्रेनिंग समांथानं ‘राजी’च्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी आणि ती खरी वाटण्यासाठी गहन आणि कठोर शारीरिक प्रशिक्षण घेतले आहेत आणि एका कठीण ट्रांसफॉर्मेशनमधून ती गेली आहे. तिनं प्रत्येक दिवशी कितीतरी तास फिजिकल ट्रेनिंग घेतलं आहे आणि या सिरीजमधील या भूमिकेसाठी खरोखरच आपला  घाम गाळला आहे.

मेथड एक्टर ‘राजी’च्या व्यक्तिरेखेला समजण्यासाठी आणि ती प्रामाणिकपणे आपल्यात उतरवण्यासाठी, समांथानं खूप रिसर्च केला. तिनं तीन दिवस स्वत:ला खोलीत बंद करून घेतले आणि राजी च्या व्यक्तिरेखेत मिसळण्यासाठी अनेक माहितीपट पाहिले.

ओटीटीवर डेब्यू करण्यासोबतच साकारणार धमाकेदार अॅक्शन सीन ‘द फॅमिली मॅन’मधील समांथाच्या डिजिटल पदार्पणात ती पूर्णपणे नवीन अवतारात पहायला मिळेल. ही तिची पहिली ग्लॅमर नसलेली भूमिका असून यात ती हार्डकोर अॅक्शन स्टंट करताना दिसणार आहे आणि स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि आपल्या शत्रूशी लढण्यासाठी कठोर पाऊलं उचलताना दिसणार आहे. समांथाच्या अभिनय कारकीर्दीत प्रथमच ती बंदूक हाताळताना दिसणार आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडीओवर 4 जूनपासून ‘द फॅमिली मॅन’ च्या नव्या सीजनमध्ये समांथा अक्किनेनीचा दमदार अभिनय पाहण्यासाठी सज्ज व्हा!

संंबधित बातम्या

Video : आधी स्वत:च्या लग्नात झिंगाट डान्स, आता ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’वर बहारदार नृत्य, श्वेता शिंदेचा व्हिडीओ व्हायरल

Photo: लूक हॉट, बी कोल्ड… प्रणाली भालेरावचा ‘टकाटक’ अंदाज पाहाच

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI