किरण राव की रीना दत्ता; आमिर खानची कोणती पूर्व पत्नी आहे सर्वात श्रीमंत?
आमिर खानने आधी रीना दत्ता आणि नंतर किरण रावशी लग्न केले होते. पण या दोघींपैकी कोण जास्त श्रीमंत आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या अभिनयाचे सर्वजण चाहते आहेत. आमिरच्या चित्रपटांची चाहत्यांना कायमच आतुरता असते. तो 2-3 वर्षांत एक चित्रपट घेऊन येतो, पण त्याचा चित्रपट जबरदस्त असतो. आमिर खान त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. त्याचा पहिला विवाह रीना दत्तासोबत झाला होता. त्यानंतर त्याने किरण रावसोबत दुसरा विवाह केला. किरणपासून घटस्फोट घेतल्यानंतर आता ते गौरी स्प्रॅटला डेट करत आहेत.
आमिर खानच्या दोन्ही पूर्व पत्नी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. रीना या चित्रपट निर्मात्या आहेत, तर किरण निर्मात्या असण्यासोबतच पटकथालेखिका आणि दिग्दर्शिका देखील आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘लापता लेडीज’ हा चित्रपट आला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला. चला, आमिर खानच्या दोन्ही पूर्व पत्नींपैकी कोण जास्त श्रीमंत आहे ते जाणून घेऊया.
Jarann movie review: कसा आहे अमृता सुभाष-अनिता दातेचा ‘जारण’ सिनेमा? वाचा रिव्ह्यू
रीना दत्ता
आमिर खानने पहिला विवाह रीना दत्तासोबत केला होता. आमिर आणि रीनाने 1986 मध्ये गुप्तपणे विवाह केला. दोघांनी गुपचूप कोर्ट मॅरेज केले होते. आपल्या पहिल्या विवाहाबद्दल आमिर अनेकदा बोलतो. त्यांना आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. आयराचं लग्न झालं आहे, तर जुनैदने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. रीना दत्ताच्या नेटवर्थबद्दल बोलायचं तर, अहवालानुसार ती 2 दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे. जवळपास 17 कोटी रुपयांची मालकीण आहे.
किरण राव
रीना दत्तापासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानने किरण रावसोबत विवाह केला. दोघांची प्रेमकहाणी चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. दोघांनी मिळून अनेक चित्रपट बनवले आहेत. आमिर आणि किरण यांना आजाद नावाचा एक मुलगा आहे, ज्याचं पालनपोषण आता घटस्फोटानंतर किरण एकटी करत आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, किरण रावची नेटवर्थ 40 दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे. 347 कोटी रुपयांची मालकिण आहे.
रीना आणि किरण यांच्या नेटवर्थचा विचार केला तर किरण जास्त श्रीमंत आहेत. तिने ‘लापता लेडीज’ या चित्रपटातून चांगली कमाई केली होती.
