Bholaa Review | अजय देवगणच्या ‘भोला’मध्ये ॲक्शनचा ‘ओव्हरडोस’; प्रेक्षकांकडून पैसा वसूलची प्रतिक्रिया

'भोला' हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. त्यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा फार मिळतीजुळती आहे. मात्र संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत.

Bholaa Review | अजय देवगणच्या 'भोला'मध्ये ॲक्शनचा 'ओव्हरडोस'; प्रेक्षकांकडून पैसा वसूलची प्रतिक्रिया
Bholaa MovieImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 12:27 PM

मुंबई : रामनवमीचं निमित्त साधत अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. लोकेश कनगराज यांच्या ‘कैथी’ या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. अजय देवगणने यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचसोबत त्याने दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. अजयचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता त्याच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.

चित्रपटाची कथा

या चित्रपटाची कथा पोलीस अधिकारी डायना जोसेफ (तब्बू) आणि कैदी भोला (अजय देवगण) यांच्या अवतीभोवती फिरते. या चित्रपटाची सुरुवात तब्बूच्या दमदार फाइट सीनने होते. डायना ही प्रामाणिक आणि साहसी पोलीस अधिकारी असते. आपल्या कामाप्रती ती सतत जागरूक असते. एका ड्रग डीलर गँगचा सामना करताना ड्रग्जचा मोठा साठा तिच्या हाती लागतो. त्यावेळी काही गुंडांना पकडून ती तुरुंगात डांबते.

डायना तिच्या या कारवाईमुळे अश्वत्थामाच्या (दीपक डोब्रियाल) निशाण्यावर येते. अश्वत्थामा ऊर्फ आशू हा गावचा असा बाहुबली आहे, जो राजकारणातील मोठ्या नेत्यांसाठी काम करतो. आशुला देवराज सुब्रमण्यम (गजराज राव) आदेश देतो की काहीही करून त्याने डायनाच्या पोलीस ठाण्यातून तो ड्रग्जचा साठा परत मिळवावा. जेव्हा डायना ड्रग्ज पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवून तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिटायरमेंट पार्टीत सहभागी होते, तेव्हा आशु तिच्या पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचा प्लॅन बनवतो.

हे सुद्धा वाचा

पार्टीत सहभागी झालेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या दारूमध्ये नशेचं औषध मिसळवलं जातं. मात्र हाताला दुखापत झाल्याने डायना ती दारू पिण्यास नकार देते. याच कारणामुळे डायनाशिवाय सर्व पोलीस कर्मचारी बेशुद्ध होतात. आता एका बाजूला डायनाच्या समोर पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्याचं आव्हान आहे. तर दुसरीकडे तिला ड्रग्ज पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊ नये याचीही काळजी घ्यायची आहे.

सर्व बाजूंनी समस्यांनी घेरलेल्या डायनाला भोलाची आठवण येते. 10 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर भोलाची सुटका झाली आहे आणि तो त्याच्या मुलीला भेटण्यासाठी निघालेला असतो. अशावेळी डायना भोलाची मदत घेते. मात्र भोलाला पोलीस कर्मचाऱ्यांविषयी प्रचंड राग आहे. त्यामुळे तो तिची मदत करणार की नाही, हे प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळेल.

या चित्रपटातील अभिषेक बच्चनची भूमिका ही प्रेक्षकांसाठी सरप्राइज ठरू शकते. तर आमला पॉलचीही यात छोटी भूमिका आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अजय देवगणसोबत अभिषेक बच्चन आणि आमला पॉलला मुख्य भूमिकांमध्ये दाखवलं जाईल.

कसा आहे चित्रपट?

‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. त्यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा फार मिळतीजुळती आहे. मात्र संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत. अजय देवगणने चित्रपटातील ॲक्शन सीन्सला नव्या अंदाजात सादर केले आहेत. आजकाल चित्रपटांमध्ये हॉलिवूड किंवा साऊथच्या चित्रपटांमधून प्रेरणा घेऊन ॲक्शन सीन्स दाखवले जातात. मात्र अजय देवगणच्या या चित्रपटातील ॲक्शन सीन्समध्ये नवेपणा जाणवतो.

या चित्रपटात संजय मिश्राची भूमिका अधिक प्रभावित करणारी आहे. याशिवाय दीपक डोब्रियाल आणि तब्बू यांच्यासह इतर कलाकारांचंही अभिनय दमदार आहे. भोलामध्ये ॲक्शनसोबतच कॉमेडी आणि रोमान्सचाही तडका आहे. IMAX 3D मध्ये ॲक्शन सीन्स पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत चांगला अनुभव असू शकतो. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीही उत्तम आहे. या चित्रपटाचं शूटिंग बऱ्याच शानदार लोकेशन्सवर करण्यात आलं आहे. ॲक्शन सीन्सचा भरणा असलेल्या या चित्रपटात मूळ गाण्यांचा अभाव दिसून येतो. मध्यांतरापूर्वी या चित्रपटाची कथा धिमी वाटू लागते, मात्र मध्यांतरानंतर ती कथा जलदगतीने पुढे जाताना दिसते.

का पहावा?

जर तुम्हाला ॲक्शनपटांची आवड असेल तर भोला हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. यामधील स्टंट्स, फाइट सीक्वेन्स तुम्हाला खूप आवडतील. त्याचसोबत रोमान्स आणि कॉमेडीचा तडका तुम्हाला ‘पैसा वसूल’ चित्रपटाचा अनुभव देईल.

का पाहू नये?

अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाच्या कथेत नवेपणा आढळत नाही. ज्यांना ॲक्शन फार आवडत नाही, त्यांच्यासाठी हा चित्रपट नाही. अजयने जरी या चित्रपटातील ओरिजिनल ॲक्शन सीन्स दिग्दर्शित केले असले तरी काही सीन्स पाहिल्यानंतर साऊथच्या चित्रपटांची आठवण येते.

Non Stop LIVE Update
या कंपन्यांना होणार फायदा,रजनीश कुमार बँकिंग सिस्टीमविषयी काय म्हणाले?
या कंपन्यांना होणार फायदा,रजनीश कुमार बँकिंग सिस्टीमविषयी काय म्हणाले?.
अख्ख्या समाजाची छी थू झालीय, का घाबरताय...,' काय म्हणाले अजय महाराज
अख्ख्या समाजाची छी थू झालीय, का घाबरताय...,' काय म्हणाले अजय महाराज.
देशात AI किती मोठे चॅलेंज?आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात?
देशात AI किती मोठे चॅलेंज?आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात?.
मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री आपल्याच सरकारवर भडकल्या? बघा कसं झापलं?
मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री आपल्याच सरकारवर भडकल्या? बघा कसं झापलं?.
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख.
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?.
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट.
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले.
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार.
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास.