AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कांतारा चॅप्टर 1’ च्या शूटिंगवेळी मोठी दुर्घटना, 30 क्रू मेंबर्स असणारी बोट उलटली अन्…

'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाच्या शूटिंगला ग्रहन लागल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक बोट उलटली, ज्यामध्ये 30 क्रू मेंबर्स होते अशी माहिती समोर आली आहे.

'कांतारा चॅप्टर 1' च्या शूटिंगवेळी मोठी दुर्घटना, 30  क्रू मेंबर्स असणारी बोट उलटली अन्...
kantara
| Updated on: Jun 15, 2025 | 7:13 PM
Share

दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाच्या शूटिंगला ग्रहन लागल्याचे दिसत आहे. कारण या चित्रपटाच्या निर्मात्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना घडत आहेत. अभिनेता कलाभवन निजूचा शूटिंगदरम्यान मृत्यू झाला होता, त्यानंतर आता चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक बोट उलटली ज्यामध्ये 30 क्रू मेंबर्स होते अशी माहिती समोर आली आहे.

बोट बुडाली

‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाचे शूटींग कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात सुरु आहे. मस्ती कट्टे भागात असलेल्या मणी जलाशयात ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातातनंतर सर्वजण सुरक्षित आहेत. या घटनेत कोणतीली जीवितहानी झालेली नाही.

महागडे कॅमेरे आणि इतर उपकरणे पाण्यात बुडाली

कांतारा चित्रपटाला मोठे यश मिळाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी हे दुसरा भाग बनवत आहेत. मात्र मे महिन्यापासून शूटिंगदरम्यान अनेक अनुचित घटना घडत आहेत. आता बोट उलटून झालेल्या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, मात्र या घटनेत अनेक महागडे कॅमेरे आणि इतर उपकरणे पाण्यात बुडाली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

शूटिंगपूर्वी देवाची पूजा

रामदास पुजारी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘दक्षिण कन्नडमधील आत्म्यांवर चित्रपट बनवणे हे धोकादायक आहे. परंतु ऋषभ शेट्टीने या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी देवाची पूजा देखील केली होती आणि त्याने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी देखील घेतली होती.’

कांतारा चॅप्टर 1 कधी प्रदर्शित होणार?

कांतार चॅप्टर 1 चित्रपटाच्या शूटींग बाबत मे महिन्यापासून अनेक वाईट बातम्या समोर आल्या आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ३ कलाकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच याशिवाय दोन मोठे अपघातही झाले आहेत. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख 2 ऑक्टोबर 2025 आहे, मात्र यात बदल होण्याची शक्यता आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.