‘किसको दुख सुनाए..’ मित्र धर्मेंद्र यांना भेटल्यानंतर बिग बी अमिताभ यांनी केलेली भावूक पोस्ट चर्चेत
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचे मित्र दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, त्यानंतर त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर केलेली पोस्ट लोकांना विचार करायला लावत आहे.

Amitabh Bachchan Post: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर बुधवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. आता त्यांच्यावर जुहूतील घरात उपचार सुरु आहेत.तेथे आता बॉलीवूडचे त्यांचे सहकारी भेटत असून त्यांची विचारपूस करत आहेत.
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचे मित्र बिग बी अमिताभ बच्चन देखील स्वत: धर्मेंद्र यांची विचारपूस करण्यास पोहचले. बिग बी स्वत: त्यांची कार चालवत आपल्या मित्राला भेटायला पोहचले. धर्मेंद्र यांची ख्याली खुशाली विचारली आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट केली. ज्यावर लोक आता विचार करत आहेत.
धर्मेंद्र यांना भेटल्यानंतर भावूक झाले अमिताभ
धर्मेंद्र यांची भेट घेतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. त्यात त्यांनी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेची एक ओळ शेअर केली आहे.अमिताभ बच्चन यांनी लिहिलेय की, “वो किसे दोषी ठहराये, और किसको दुख सुनाये ; जब कि मिट्टी साथ मिट्टी के करे अन्याय ” – हरिवंश राय बच्चन
काय बोलू इच्छीतात बिग बी?
बिग बी अमिताभ यांनी आपल्या वडीलांच्या ओळींच्या माध्यमातून काय सांगू इच्छीतात ? जेव्हा माणूसच माणसासोबत अन्याय करत असेल तर कोणाला आपले दु:ख सांगायचे आणि कोणाला त्यासाठी दोषी ठरवायचे. बिग बी यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर युजर्स अनेक प्रतिक्रीया देत आहेत.
येथे पाहा पोस्ट –
T 5563 – “वो किसे दोषी ठहराये, और किसको दुख सुनाये ; जब कि मिट्टी साथ मिट्टी के करे अन्याय ” ~ हरिवंश राय बच्चन pic.twitter.com/iKxMCzEG5b
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 13, 2025
50 वर्षे जुनी अमिताभ-धर्मेंद्र यांची दोस्ती
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची मैत्री 50 वर्षे जुनी आहे.साल 1975 आलेला चित्रपट ‘चुपके चुपके’ आणि ‘शोले’ दरम्यान दोघांची मैत्री झाली ते एकमेकांचे चांगले मित्र झाले. खासकरुन शोले चित्रपटापासून. यातील ‘जय-वीरू’ ची ऐतिहासिक ऑनस्क्रीन मित्रांची दोस्ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली. शोले आणि चुपके चपके शिवाय ही जोडी 1980 चा चित्रपट ‘राम बलराम’ मध्ये देखील दिसली.
