‘बिग बॉस मराठी ३’ चा विजेता विशाल निकमची रिअल लाईफ ‘सौंदर्या’ कोण?, सोशल मीडियावर चर्चांना उधाण, विशालने स्वत: केला खुलासा

बिग बॉस मराठी ३ चा (big boss marathi session 3) विजेता अभिनेता विशाल निकम (vishal nikam) सध्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. त्याच्या चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे 'सौंदर्या'! (saundarya) विशाल निकमचं मराठी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्रीशी नाव जोडलं जात आहे. या अभिनेत्रीशी विशाल निकमचे प्रेमसंबंध असल्याचं बोललं जात आहे. मात्र विशालने स्वत: याबद्दल इन्स्टाग्रामवर (instagram) पोस्ट लिहीत स्पष्टीकरण दिलं आहे. 'त्या' मुलीशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या आयुष्यात एक स्पेशल व्यक्ती आहे. वेळ आली की तिच्याविषयी मी सांगेन, असं विशालने म्हटलं आहे.

'बिग बॉस मराठी ३' चा विजेता विशाल निकमची रिअल लाईफ 'सौंदर्या' कोण?, सोशल मीडियावर चर्चांना उधाण, विशालने स्वत: केला खुलासा

मुंबई : सोशल मीडिवर कधी काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. बिग बॉस मराठी ३ चा (big boss marathi session 3) विजेता अभिनेता विशाल निकम (vishal nikam) सध्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. त्याच्या चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे ‘सौंदर्या’! (saundarya) विशाल निकमचं मराठी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्रीशी नाव जोडलं जात आहे. या अभिनेत्रीशी विशाल निकमचे प्रेमसंबंध असल्याचं बोललं जात आहे. मात्र विशालने स्वत: याबद्दल इन्स्टाग्रामवर (instagram) पोस्ट लिहीत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘त्या’ मुलीशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या आयुष्यात एक स्पेशल व्यक्ती आहे. वेळ आली की तिच्याविषयी मी सांगेन, असं विशालने म्हटलं आहे.

विशाल निकमची इन्स्टाग्राम पोस्ट

बिग बॉस मराठी ३ चा विजेता अभिनेता विशाल निकमने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत ‘सौंदर्या’बाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे, ‘योग्य वेळ आल्यावर मी माझ्या खासगी जीवनातल्या गोष्टी उघड करेन. मी ‘सौंदर्या’चं नावही जाहीर करेन. पण मी आता इतकंच सांगेन की ‘सौंदर्या’चा चित्रपट सृष्टीशी काहीही संबंध नाही. ती एक सामान्य मुलगी आहे. त्यामुळे इतर कुठल्याही मुलीशी माझं नाव जोडू नका. जिच्याशी नाव जोडलं जातंय त्या मुलीला या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण कुणाशी माझं नाव जोडू नका. थोडा धीर धरा, मला थोडा वेळ द्या… योग्य वेळी मी माझ्या आयुष्यातील त्या स्पेशल व्यक्तीचं नाव जाहीर करेन.’

विशाल निकमने नुकतंच बिग बॉस मराठी ३ चं विजेतेपद आपल्या नावे केलं आहे. सर्वसामान्य घरातल्या विशालने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्याने त्याच्या या यशाचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. विशालने ‘मिथुन’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या धुमस या चित्रपटातही त्याने काम केलं. त्यानंतर साता जल्माच्या गाठी या स्टार प्रवाहवरच्या मालिकेत त्याने काम केलं. ‘दक्खनचा राजा जोतिबा’ ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे.

विशालने स्वत: या सगळ्याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे आतातरी या सगळ्या चर्चा संपणार का?, हे पाहणं महत्वाचं असेल. सोबतच विशालची रिअल लाईफ ‘सौंदर्या’ कोण हे विशाल कधी जाहीर करतो, पहावं लागेल.

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar health update : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, मात्र पुढचे 7-8 दिवस दिदी वैद्यकीय देखरेखीखाली, डॉक्टरांची माहिती

Tiktok Star | टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची ‘गोलीगत’ भरारी, मराठी चित्रपटात हिरो म्हणून झळकणार

सलमान खानचा शेजाऱ्यावर मानहानीचा दावा, मुंबई दिवाणी न्यायालय म्हणाले, ‘आम्ही नकार देतो!’

Published On - 1:16 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI