AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | राहुल वैद्य-दिशा परमारने गुपचूप बांधली लग्नगाठ? सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ!

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) फेम गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरू होती. ‘बिग बॉस 14’च्या घरात राहुलने दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते.

Video | राहुल वैद्य-दिशा परमारने गुपचूप बांधली लग्नगाठ? सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ!
राहुल वैद्य आणि दिशा परमार
| Updated on: Apr 09, 2021 | 6:38 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) फेम गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरू होती. ‘बिग बॉस 14’च्या घरात राहुलने दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. मात्र, आता दोघांचेही गुपचूप लग्न झाल्याचे समोर येते आहे. लग्नाचा व्हिडीओही समोर आला असून तो खूप व्हायरलही होत आहे. काही दिवसांपूर्वी या लग्नाची काही छायाचित्रेही समोर आली होती. यावरून दोघे विवाहबंधनात अडकले आहेत, असा अंदाज चाहत्यांकडून वर्तवला जात होता. दरम्यानच्या काळात दोघांनीही त्यांच्या सीक्रेट वेडिंगचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र, हा फोटो त्यांच्या नवीन म्युझिक अल्बममधला आहे (Bigg Boss 14 fame Rahul Vaidya And his girlfriend Disha Parmar share wedding photo on social media).

व्हिडीओमुळे चाहते पडले बुचकळ्यात!

व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झालेले चाहते आता या दोघांचेही अभिनंदन करत आहेत. राहुल वैद्य आणि दिशा यांनी आपापल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून फोटो पोस्ट शेअर केला आहे आणि कॅप्शन लिहिले की, ‘न्यू बिगनिंग’. टीव्ही इंडस्ट्रीचे स्टार्स या जोडीला खूप शुभेच्छा देत आहेत. त्याच वेळी, बरेच चाहते कमेंट करत ​​आहेत आणि विचारत आहेत की, हे लग्न कधी झाले?  दोघांनी फोटो पोस्ट केल्यानंतरही चाहत्यांना असे वाटते आहे की, हे फोटो खरे नाहीत, तर एखाद्या शूटिंग दरम्यानचे आहेत आणि चाहत्यांचा अंदाज खरा ठरला आहे.

पाहा दिशा-राहुलच्या लग्नाचा चर्चित व्हिडीओ

(Bigg Boss 14 fame Rahul Vaidya And his girlfriend Disha Parmar share wedding photo on social media)

अली-जास्मीनसुद्धा थिरकले!

चर्चेत आलेल्या या व्हिडीओमध्ये राहुल (Rahul Vaidya) आणि दिशा (Disha Parmar) वधू-वराच्या वेशामध्ये दिसत आहेत. दिशा परमारने डार्क पिंक कलरचा लेहेंगा परिधान केला आहे. तर, राहुल वैद्यने ऑफ व्हाईट कलरची शेरवानी घातली आहे. दोघेही एकमेकांचे हात धरून मंडपात येत आहेत. त्याचवेळी व्हिडीओमध्ये राहुलचा मित्र, अभिनेता अली गोनी (Aly Goni) आणि जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) देखील दिसत आहेत.

म्युझिक व्हिडीओची चर्चा

हा व्हिडीओ राहुलच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. तसेच, राहुल वैद्य आणि दिशा परमार लवकरच एकत्र एका म्युझिक व्हिडीओमध्ये झळकणार असल्याचे म्हटले गेले आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की, हा व्हिडीओ त्याच शूटिंग दरम्यानचा आहे. तसेच, या व्हिडीओचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. ही जोडी लवकरच एका नव्या गाण्यात एकत्र झळकणार आहे

प्यारवाली लव्हस्टोरी

गायक राहुल वैद्य यांने दिशा परमारला ‘बिग बॉस 14’च्या घरात, नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज केले होते. यानंतर दिशा परमार त्याला भेटायला आली होती आणि याचवेळी तिने राहुलचा प्रस्ताव देखील मान्य केला होता. दोघेही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दिशा परमारही राहुलच्या कुटुंबियांची खूप लाडकी आहे. ‘आम्हाला लग्न करायचे आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता इतक्यात मुहूर्त शोधणं योग्य नाही. त्यामुळे आम्ही वाट बघू’, असे राहुलने म्हटले आहे.

(Bigg Boss 14 fame Rahul Vaidya And his girlfriend Disha Parmar share wedding photo on social media)

हेही वाचा  :

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न, सासरच्यांवर केले गंभीर आरोप!

New Wink Sensation | प्रियानंतर पूजा हेगडेनेही मिचकावला ‘डोळा’, काही तासांतच व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ!

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.