Bigg boss 14 | बिग बॉसच्या घरात ट्विस्ट, घराची नवीन कॅप्टन मनु पंजाबी!

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Dec 09, 2020 | 11:43 AM

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत. परंतु, हळूहळू ‘बिग बॉस 14’ने वेगाने चर्चेत येण्यास सुरुवात केली.

Bigg boss 14 | बिग बॉसच्या घरात ट्विस्ट, घराची नवीन कॅप्टन मनु पंजाबी!

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत. परंतु, हळूहळू ‘बिग बॉस 14’ने वेगाने चर्चेत येण्यास सुरुवात केली. दरम्यान, बरेच ट्विस्ट आणि मनोरंजक वळणे सध्या ‘बिग बॉस 14’मध्ये पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात राखी सावंत वगळता इतर सर्व चॅलेंजर्स दाखल झाले आहेत. या चॅलेंजर्सच्या आगमनानंतर पहिला कॅप्टन टास्क घरात झाला. त्याचवेळी, एका दिवसाचा राजा बनलेल्या राहुल महाजनने सर्वांची परीक्षा घेतली. (Bigg Boss 14 Twist in the house of Bigg Boss) अर्शी खान कश्मीरा शाहला किचनमध्ये बोलावते आणि तिच्यासोबत किचनमधील कामात मदत कर म्हणते. त्यावेळी कश्मीरा शाह म्हणते की, तुझ्या सांगण्यावरून मी काम करणार नाही. हे ऐकल्यानंतर अर्शी खान आणि कश्मीरा शाह यांच्यामध्ये भांडणे होतात. मात्र त्यानंतर कश्मीरा शाहला अर्शी खान बोलते त्यानंतर दोघी ऐकमेंकाना बोलतात.

कॅप्टन्सी टास्कमध्ये बिग बॉस एक दिवसाचा राजा राहुल महाजनला करतो. घराचा नवीव कॅप्टन निवडण्याची संधी देण्यात आली आहे. घराची कॅप्टन म्हणून मनु पंजाबाची निवड केली जाते. एजाज म्हणतो की रुबीना, अभिनव आणि जास्मीन कर्णधार होण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत, तेव्हा रुबीनाने एजाजसमोर आपली बाजू मांडली. रुबीना सांगते की, इजाजने स्पष्टपणे सांगितले होते की तो कोणाला कर्णधार बनवणार आहे. एजाज म्हणतो की, रुबीना तु गैरसमज करून घेतला आहे. कॅप्टनच्या निवडीनंतर विकास जास्मीनशी बोलतो. तेव्हा जास्मीन म्हणते की, मला खूपच एकएकटे वाटत आहे. अली गेल्यापासून मला इथे कसे तरी वाटत आहे. त्याला जाण्यापासून मी त्यादिवशी रोखू शकले असते.

अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविता फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | सलमान खानचा मोठा धमाका, पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस 14’चा महाअंतिम सोहळा

Bigg Boss 14 |रूबीना-जास्मीनच्या मैत्रीत फूट, अभिनव आणि रूबीनामध्येही वाद बिग बॉसच्या घराचे चित्र पालटले!

(Bigg Boss 14 Twist in the house of Bigg Boss)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI