AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 18 विजेत्याला मिळणार इतकी मोठी रक्कम? फिनालेच्या आधीच अनेक गोष्टी लीक

Bigg Boss 18: 'बिग बॉस 18' चा विजेत्याचं नाव घोषित होताच त्यावर होणार पैशांचा वर्षाव... विजेत्याला मिळणार इतकी मोठी रक्कम? शोच्या फिनाले आधीच अनेक गोष्टी लीक, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बॉसच्या चर्चा...

Bigg Boss 18 विजेत्याला मिळणार इतकी मोठी रक्कम? फिनालेच्या आधीच अनेक गोष्टी लीक
| Updated on: Oct 07, 2024 | 11:43 AM
Share

अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ ची चाहते प्रतीक्षा करत असतात. अभिनेत्याचा रिॲलिटी शो नव्या अंदाजासह, नव्या सिझनसह चाहत्यांच्या भेटीस आला आहे. कलर्स टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘बिग बॉस 18’ मध्ये 18 स्पर्धक सहभागी होणार आहेत. यावेळी बिग बॉसच्या घरात बॉलिवूड – टीव्ही सेलिब्रिटी, सोशल मीडिया स्टार, राजकारणी व्यक्ती देखील सहभागी होणार आहेत. 105 दिवसांच्या प्रवासानंतर विजेता घोषित होणार आहे. पण त्याआधीच विजेत्याला मिळणाऱ्या रकमेचा आकडा समोर आला आहे.

सांगायचं झालं तर, प्रत्येक वेळी बिग बॉस विजेत्यासाठी मोठ्या रकमेची घोषणा करत असतो. पण अनेकदा रक्कम कमी – जास्त होते. शिवाय विजेत्याला ट्रॉफी आणि कार देखील दिली जाते. अशात ‘बिग बॉस 18’ च्या विजेत्याला किती धनादेश मिळणार… याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘बिग बॉस 18’ च्या विजेत्याचं धनादेश

‘बिग बॉस 18’ च्या विजेत्याला तब्बल 50 लाख रुपये धनादेश मिळणार आहे. पण संबंधित रक्कम कमी किंवा जास्त होऊ शकते. अशा परिस्थितीत ही रक्कमही अंतिम नाही. बऱ्याच वेळा अंतिम स्पर्धकांना काही बक्षीस रकमेसह शो सोडण्याचा पर्याय दिला जातो. मात्र, यावेळी या गोष्टी होतील की नाही हे सांगणं कठीण आहे.

मुनव्वर फारूकी याला किती मिळाले होते पैसै?

मुनव्वर फारुकी याने ‘बिग बॉस 17’ शो जिंकला होता. विजेता घोषित होताच अभिनेत्याला 50 लाख रुपयांचं बक्षिस मिळालं होतं. याशिवाय त्याला भव्य ट्रॉफी आणि चमकणारी हुंडई क्रेटा कार देण्यात आली. मुनव्वाकच्या आधी एमसी स्टॅनने बिग बॉस 16 ची ट्रॉफी जिंकली होती. त्याला बक्षीस म्हणून 31.8 रुपये मिळाले. तर बिग बॉस 15 च्या विजेत्या तेजस्वी प्रकाशला 40 लाख रुपये मिळाले आहेत.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.