AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 18 : वोटिंग ट्रेंडमध्ये कोण आघाडीवर? सोशल मीडिया पोलनुसार टॉप 3 स्पर्धकांची यादी समोर

सलमान खानचा शो बिग बॉस 18 चा फिनाले आज रविवारी म्हणजे 19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.विजेता कोण असेल हे तर नंतर समजेलच, पण त्याआधी टॉप 3 मध्ये आपल्याला कोणते स्पर्धक दिसू शकतात याची यादी समोर आली आहे. सोशल मीडियावर आलेल्या पोलनुसार ते टॉप 3 स्पर्धक कोण असणार याची यादी समोर आली आहे.

Bigg Boss 18 : वोटिंग ट्रेंडमध्ये कोण आघाडीवर? सोशल मीडिया पोलनुसार टॉप 3 स्पर्धकांची यादी समोर
| Updated on: Jan 19, 2025 | 6:48 PM
Share

सलमान खानचा शो बिग बॉस 18 चा फिनाले आज रविवारी म्हणजे 19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. बीबी 18 च्या चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. बीबी 18 चा विजेता कोण असेल हे जाणून घेण्याआधी, टॉप 3 मध्ये आपल्याला कोणते स्पर्धक दिसू शकतात याबद्दल जाणून घेऊयात.

टॉप 3  स्पर्धकांची यादी समोर 

बिग बॉस 18 चा तीन महिन्यांचा हा अद्भुत प्रवास 19 जानेवारीला संपणार आहे. सीझन 18 च्या विजेत्यासाठी फॅन क्लबवर प्रचंड मतदान घेण्यात येत आहे. शोमध्ये शेवटपर्यंत पोहोचलेले सहा टॉप फायनलिस्ट कोण आहेत ते पाहुयात.

विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अवनिशा मिश्रा, रजत दलाल, चुम दरंग आणि ईशा सिंग अंतिम फेरीत पोहोचले आहेत. यांपैकी आता कोणाला ट्रॉफी मिळेल याबद्दल नक्कीच सर्वांना उत्सुकता आहे. सीझन 18 चा ग्रँड फिनाले 19 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता कलर्स टीव्ही आणि OTT ॲप जिओ सिनेमावर पाहता येईल.

वोटींग ट्रेंडमध्ये कोण आघाडीवर आहे? सीझन 18 च्या विजेत्यासाठी फॅन क्लबवर प्रचंड मतदान घेण्यात येत आहे. प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी भरभरून वोट करत आहेत. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, आणि वोटींग पोल नुसार टॉप 3 मध्ये कोणते स्पर्धक असतील याचा अंदाज बांधता येतोय.

तर रजत दलाल, विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा हे टॉप 3 मध्ये असतील असं म्हटलं जातं आहे. तर, करण-विवियनचा उल्लेख टॉप 2 मध्ये करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बक्षिसाची रक्कम किती आहे? बिग बॉस 18 च्या विजेत्याला ट्रॉफीसह 50 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. परंतु निर्मात्यांनी कोणत्याही एका स्पर्धकाला मनी बॅग ऑफर केल्यास, जिंकलेल्या रकमेमध्ये ठेवलेल्या रकमेनुसार कमी होऊ शकते.

मात्र वोटींग लाइन बंद होईपर्यंत चित्र बदलूही शकतं. त्यामुळे कोणता स्पर्धक कोणत्या स्थानावर असणार, आणि कोण विजेता असणार. त्यामुळे स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे की कोणता स्पर्धक यंदाची ट्रॉफी घेऊन जाणार याची.

दरम्यान आज या सीझनचा विजेता सलमान खान घोषित करणार आहे. प्रेक्षकांना जियो सिनेमा आणि जियो टीव्हीवरही लाइव्ह एपिसोड पाहता येणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.