Bigg Boss 18 Winner LIVE: करणवीर मेहरा ठरला ‘बिग बॉस 18’चा विजेता

| Updated on: Jan 20, 2025 | 1:12 AM

Bigg Boss 18 Hindi Grand Finale & Winner LIVE Updates: 'बिग बॉस 18'ची ट्रॉफी पटकावण्यासाठी सहा स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. आज (19 जानेवारी) या लोकप्रिय शोचा ग्रँड फिनाले पार पडणार असून लवकरच विजेता जाहीर होणार आहे. ग्रँड फिनालेचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या..

Bigg Boss 18 Winner LIVE: करणवीर मेहरा ठरला 'बिग बॉस 18'चा विजेता
करणवीर मेहरा, विवियन डिसेनाImage Credit source: Instagram

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. हिंदीसोबतच इतरही भाषांमध्ये या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘बिग बॉस’चा अठरावा सिझन 6 ऑक्टोबर 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आज रविवारी 19 जानेवारी रोजी या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला. तब्बल 105 दिवसांनंतर या शोचा विजेता घोषित झाला. ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन अभिनेता सलमान खानने केलं. तर फिनालेच्या एपिसोडमध्ये आमिर खान, जुनैद खान, खुशी कपूर, वीर पहाडिया यांसारखे सेलिब्रिटीसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. या सिझनमध्ये 23 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी सहा स्पर्धकांनी ग्रँड फिनालेपर्यंत प्रवास केला. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, ईशा सिंह, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि रजत दलाल यांपैकी करणवीरने ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी पटकावली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Jan 2025 12:46 AM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: करणवीर मेहरा ठरला ‘बिग बॉस 18’चा विजेता

    टीव्ही अभिनेता करणवीर मेहराने ‘बिग बॉस 18’चं विजेतेपद पटकावलं आहे. तर विवियन डिसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

  • 20 Jan 2025 12:43 AM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: विजेता घोषित होण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी

    ‘बिग बॉस 18’च्या घरातील लाइट्स बंद झाले आहेत. सलमान खानसोबत करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना उभे राहिले आहेत. अवघ्या काही मिनिटांत विजेता घोषित होणार आहे.

  • 20 Jan 2025 12:36 AM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: आमिरने सलमान आणि शाहरुखसोबत बिग बॉसच्या घरात राहण्याची इच्छा केली व्यक्त

    शाहरुख खान आणि सलमान खानसोबत बिग बॉसचा खेळ खेळण्याची इच्छा आमिर खानने व्यक्त केली. तर तिघांपैकी एक स्पर्धक घराबाहेर पडेल आणि तो मीच असेन, असं गमतीशीर उत्तर सलमानने आमिरला दिलं.

  • 20 Jan 2025 12:31 AM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यासाठी लाइव्ह वोटिंग सुरू

    टॉप 2 स्पर्धकांसाठी १० मिनिटे लाइव्ह वोटिंग सुरू करण्यात आली आहे. करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांना प्रेक्षक जियो सिनेमाद्वारे वोट करू शकतात.

  • 20 Jan 2025 12:29 AM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: टॉप 3 स्पर्धकांपैकी रजत दलालचा बिग बॉसमधील प्रवास संपला

    सलमान खानने टॉप 2 स्पर्धकांची घोषणा केली. करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना या दोघांमध्ये ट्रॉफीसाठी अंतिम चुरस रंगेल. तर फिटनेस इन्फ्लुएन्सर रजत दलाल बिग बॉसमधून बाहेर पडला आहे. रजतच्या एलिमिनेशनवर सलमानसह इतर स्पर्धकांनीही आश्चर्य व्यक्त केलंय.

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

  • 20 Jan 2025 12:22 AM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: आमिरने सलमानसोबत ‘अंदाज अपना अपना 2’मध्ये काम करण्याची इच्छा केली व्यक्त

    ‘बिग बॉस 18’च्या ग्रँड फिनालेच्या मंचावर आमिरने सलमानसोबत ‘अंदाज अपना अपना 2’ या चित्रपटात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. “माझ्या मते आपण आता अंदाज अपना अपना 2 हा चित्रपट बनवला पाहिजे”, असं आमिर सलमानला म्हणाला. यावेळी दोघांनी ‘अंदाज अपना अपना’मधील एक सीनसुद्धा रिक्रिएट केला.

  • 20 Jan 2025 12:13 AM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: आमिर खानसोबत सलमान खानची धमाल मस्ती

    मुलगा जुनैद खानच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आमिर खान ‘बिग बॉस 18’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला. यावेळी दोघांमध्ये रंगलेला संवाद ऐकून इतर स्पर्धकसुद्धा खुश झाले. दुसरीत सलमानसोबत एकाच वर्गात शिकल्याची आठवणसुद्धा आमिरने यावेळी सांगितली.

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

  • 20 Jan 2025 12:00 AM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: अविनाशच्या मते ‘हा’ स्पर्धक जिंकू शकतो बिग बॉस 18

    “पहिल्या दिवसापासून आजपर्यंत अविनाश मिश्रा हा सर्वांत सक्रिय स्पर्धक होता,” अशा शब्दांत सलमान खानने कौतुक केलं. तर बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर अविनाशने विवियन डिसेना हाच विजेता व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. मात्र बिग बॉसचा खेळ पाहता करणवीर मेहरा हा शो जिंकू शकतो, असा अंदाज त्याने वर्तवला आहे.

  • 19 Jan 2025 11:49 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: जुनैद खान आणि खुशी कपूरने केली टॉप 3 स्पर्धकांची घोषणा

    आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवी-बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर हे त्यांचा आगामी ‘लवयापा’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ग्रँड फिनालेमध्ये आले. यावेळी त्यांनी टॉप 3 स्पर्धकांची घोषणा केली. अविनाश मिश्राला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं.

  • 19 Jan 2025 11:40 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा ग्रँड फिनालेच्या मंचावर एकत्र

    ‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक मन्नारा चोप्रा आणि अंकिता लोखंडे ग्रँड फिनालेच्या मंचावर एकत्र आले. यावेळी दोघींनी एल्विश यादव, अभिषेक कुमार आणि विकी जैन यांच्यासोबत मिळून स्टेजवर धमाल केली. ‘द लाफ्टर शेफ्स सिझन 2’च्या प्रमोशनसाठी हे सर्वजण एकत्र आले.

  • 19 Jan 2025 11:33 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: बिग बॉसच्या मंचावर पोहोचला आमिर खान

    अभिनेता आमिर खानने ‘बिग बॉस 18’च्या ग्रँड फिनालेमध्ये हजेरी लावली आहे. मुलगा जुनैद खानच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आमिर या शोमध्ये पोहोचला आहे. यावेळी सलमानसोबत मिळून त्याने स्टेजवर धमाल केली.

  • 19 Jan 2025 11:21 PM (IST)

    काम्याने फिनालेच्या आधीच ‘या’ स्पर्धकाला ठरवलं विजेता

    अभिनेत्री काम्या पंजाबीचं ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसचा विजेता घोषित होण्याआधीच तिने ट्विट करत विजेत्याचं नाव जाहीर केलं आहे. काम्याच्या मते अभिनेता करणवीर मेहरा हा सिझन जिंकू शकतो. वाचा सविस्तर..

  • 19 Jan 2025 11:08 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: एल्विश यादव, अभिषेक कुमार आणि विकी जैनची कॉमेडी

    ‘लाफ्टर शेफ सिझन 2’चे कलाकार एल्विश यादव, अभिषेक कुमार आणि विकी जैन त्यांच्या शोचं प्रमोशन करण्यासाठी बिग बॉसच्या मंचावर पोहोचले. सलमान खानसोबत मिळून त्यांनी काही माजी स्पर्धकांची खिल्ली उडवली.

  • 19 Jan 2025 10:56 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: चुम दरांग ‘बिग बॉस 18’च्या घराबाहेर

    ‘बिग बॉस 18’च्या ग्रँड फिनालेमध्ये मॉडेल आणि सामाजिक कार्यकर्ती चुम दरांग पाचव्या स्थानी राहिली. चुम दरांगने या शोद्वारे बरीच लोकप्रियता मिळवली.

  • 19 Jan 2025 10:19 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: अभिनेता वीर पहाडियाने टॉप 5 स्पर्धकांची केली घोषणा

    ‘स्कायफोर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वीर पहाडियाने ग्रँड फिनालेमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने टॉप 5 स्पर्धकांची घोषणा केली. त्यानुसार ईशा सिंह सर्वांत आधी बिग बॉसच्या घराबाहेर पडली.

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

  • 19 Jan 2025 10:16 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: या एका स्पर्धकाला फिनालेमध्ये पाहून सर्वांनाच बसलाय धक्का

    ग्रँड फिनालेमध्ये टीव्ही अभिनेत्री ईशा सिंहला पाहून आश्चर्य वाटत असल्याची भावना घराबाहेर पडलेल्या अनेक स्पर्धकांनी बोलून दाखवली.

  • 19 Jan 2025 10:08 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: पुढचा सिझन माझ्याने होणार नाही- सलमान खान

    सूत्रसंचालक सलमान खान स्पर्धकांशी बोलताना म्हणतो, “गेल्या 15 वर्षांपासून मी या शोचं सूत्रसंचालन करतोय. पण पुढच्या वर्षी माझ्याने हा शो होणार नाही.”

  • 19 Jan 2025 10:01 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: करणवीर मेहरा Vs विवियन डिसेना; कोण जिंकणार ट्रॉफी

    विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा या दोघांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी अंतिम चुरस रंगली आहे. अठराव्या सिझनच्या पहिल्याच एपिसोडपासून दोघं चर्चेत आहेत. या दौघांपैकी ट्रॉफी कोण पटकावणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 19 Jan 2025 09:51 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: बिग बॉसच्या चाहत्यांना मोठा धक्का; टॉप 3 पैकी सर्वाधिक चर्चेतला स्पर्धक बाद

    बिग बॉसच्या चाहत्यांना मोठा धक्का देणारी अपडेट समोर येत आहे. ‘बिग बॉस तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, टॉप 3 स्पर्धकांपैकी रजत दलाल घराबाहेर पडला आहे. त्यामुळे विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा या दोघांमध्ये अंतिम चुरस रंगली आहे.

  • 19 Jan 2025 09:48 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: जवळच्या व्यक्तींचा, चाहत्यांचा व्हिडीओ पाहून स्पर्धक भावूक

    ‘बिग बॉस 18’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा आणि चाहत्यांचा व्हिडीओ दाखवण्यात आला. हे व्हिडीओ पाहून स्पर्धकांचे डोळे पाणावले.

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

  • 19 Jan 2025 09:36 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: ग्रँड फिनाले एपिसोडची सुरुवात

    सूत्रसंचालक सलमान खानने ‘बिग बॉस 18’च्या ग्रँड फिनालेची दमदार सुरुवात केली आहे. कलर्स टीव्ही आणि जियो सिनेमावर फिनालेचा एपिसोड तुम्हाला लाइव्ह पाहता येणार आहे.

  • 19 Jan 2025 09:25 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: रजत दलाल, विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात चुरस

    रिपोर्ट्सनुसार करणवीर मेहरा, रजत दलाल आणि विवियन डिसेना हे तिघं टॉप 3 मध्ये पोहोचले आहेत. या तिघांपैकी रजत दलाल आणि विवियन डिसेना यांना प्रेक्षकांकडून अधिक पाठिंबा मिळतोय.

  • 19 Jan 2025 09:09 PM (IST)

    टॉप 3 स्पर्धकांसाठी कोण करू शकणार वोटिंग?

    जियो सिनेमाच्या सर्व युजर्ससाठी लाइव्ह वोटिंगची सुविधा सुरू असेल. वोट करण्यासाठी युजर्सना जियो प्रीमिअम सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. परंतु लाइव्ह एपिसोड्स पाहण्यासाठी युजर्सना सक्रिय सबस्क्रिप्शन प्लॅनची गरज असेल.

  • 19 Jan 2025 08:44 PM (IST)

    Bigg Boss 18 Live Voting: टॉप 3 स्पर्धकांसाठी लाइव्ह वोटिंग होणार?

    यंदाच्या सिझनमध्ये टॉप 3 स्पर्धकांसाठी लाइव्ह वोटिंग सुरू करण्यात येणार असल्याचं वृत्त ‘बिग बॉस तक’ या ट्विटर पेजने दिलंय. करणवीर मेहरा, रजत दलाल आणि विवियन डिसेना या तिघांसाठी दहा ते पंधरा मिनिटं लाइव्ह वोटिंग सुरू असेल.

  • 19 Jan 2025 08:20 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: ईशा सिंह, चुम दरांगनंतर ‘हा’ स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर?

    आधी ईशा सिंह, त्यानंतर चुम दरांग आणि आता अविनाश मिश्रा ‘बिग बॉस 18’च्या घराबाहेर पडल्याचं समजतंय. ‘बिग बॉस तक’ने दिलेल्या वृत्तानुसार अविनाशचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. त्यामुळे आता रजत दलाल, विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा या तिघांमध्ये अंतिम चुरस रंगली आहे.

  • 19 Jan 2025 08:06 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: ईशा सिंहनंतर ‘या’ स्पर्धकाचा ‘बिग बॉस 18’मधील प्रवास संपुष्टात

    अभिनेत्री ईशा सिंहनंतर ‘बिग बॉस 18’च्या घरातून आणखी स्पर्धक बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे. ‘बिग बॉस तक’ या ट्विटर पेजनं दिलेल्या माहितीनुसार चुम दरांगचा बिग बॉसमधील प्रवास संपुष्टात आला आहे. ईशा आणि चुम दरांगनंतर आता ‘बिग बॉस 18’च्या घरात फक्त चार स्पर्धक राहिले आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा आणि रजत दलाल या चौघांमध्ये अंतिम चुरस रंगली आहे.

  • 19 Jan 2025 07:45 PM (IST)

    Bigg Boss 18 Grand Finale: सहा स्पर्धकांपैकी ईशा सिंहचा पत्ता कट?

    ‘बिग बॉस तक’ या ट्विटर पेजनं दिलेल्या माहितीनुसार, ग्रँड फिनालेमधून अभिनेत्री ईशा सिंह बाद झाली आहे. त्यामुळे आता ट्रॉफीसाठी पाच स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. यात विवियन डिसेना, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि करणवीर मेहरा यांचा समावेश आहे.

  • 19 Jan 2025 07:31 PM (IST)

    ‘बिग बॉस 18’साठी सलमान खानने आकारली तब्बल इतकी फी

    ‘बिग बॉस 18’च्या संपूर्ण सिझनसाठी सूत्रसंचालक सलमान खानने तगडं मानधन स्वीकारल्याचं कळतंय. त्याच्या मानधनाचा आकडा हा ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही अधिक असल्याचं समजतंय. वाचा सविस्तर वृत्त..

  • 19 Jan 2025 07:12 PM (IST)

    ‘बिग बॉस’च्या माजी स्पर्धकांची खास हजेरी

    बिग बॉसच्या आधीच्या सिझनमध्ये बाद झालेले आणि फिनालेपर्यंत पोहोचलेले काही स्पर्धक या ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विकास जैन, शिल्पा शिरोडकर, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अधिती मिस्त्री यांचा समावेश असेल.

  • 19 Jan 2025 07:05 PM (IST)

    ग्रँड फिनालेसाठी शूटिंग न करताच अक्षय कुमार सेटवरून निघाला

    अभिनेता अक्षय कुमारने दुपारी 3.15 वाजेपर्यंत ‘बिग बॉस 18’च्या सेटवर सूत्रसंचालक सलमान खानची प्रतीक्षा केली. मात्र सलमान सेटवर वेळेत न आल्याने अखेर अक्षय सेटवरून निघाल्याचं समोर येतंय. ‘जॉली एलएलबी 3’च्या शूटिंगसाठी वेळ दिल्याने अक्षय बिग बॉसच्या सेटवरून निघाला. त्यामुळे फिनालेच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना अक्षय कुमारला पाहता येणार नाही.

  • 19 Jan 2025 07:02 PM (IST)

    चाहत पांडेकडून चुम दरांगला पाठिंबा

    ‘बिग बॉस 18’मधून बाद झालेली स्पर्धक आणि अभिनेत्री चाहत पांडेनं चुम दरांगला पाठिंबा दर्शविला आहे. चुम दरांगने हा सिझन जिंकावा, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.

  • 19 Jan 2025 06:49 PM (IST)

    Bigg Boss 18: वोटिंग ट्रेंडनुसार टॉप 3 स्पर्धकांची यादी समोर

    Bigg Boss 18: सलमान खानचा शो बिग बॉस 18 चा फिनाले आज रविवारी म्हणजे 19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. बीबी 18 च्या चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

    बीबी 18 चा विजेता कोण असेल हे जाणून घेण्याआधी, टॉप 3 मध्ये आपल्याला कोणते स्पर्धक दिसू शकतात याबद्दल जाणून घेऊयात. सोशल मीडिया पोलनुसार त्या टॉप 3 स्पर्धकांची यादी समोर आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

  • 19 Jan 2025 06:43 PM (IST)

    रजत दलाल मारणार बाजी?

    सुरुवातीच्या वोटिंग ट्रेंड्सनुसार रजत दलाल हा विजेतेपद पटकावणार असल्याची शक्यता समोर येत आहे. तर विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यातही तगडी टक्कर पहायला मिळतेय.

  • 19 Jan 2025 06:41 PM (IST)

    युट्यूबर एल्विश यादवकडून रजत दलालला पाठिंबा

    प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने ‘बिग बॉस 18’ फायनलिस्ट रजत दलाल याला पाठिंबा दिला आहे. गेल्या रात्री त्याने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत रजतला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. इतकंच नव्हे, जर रजतने बिग बॉस 18 चं विजेतेपद पटकावलं तर 101 आयफोन 16 प्रो मॅक्स मोबाइल फोन्स वाटणार असल्याचं त्याने जाहीर केलंय.

  • 19 Jan 2025 05:06 PM (IST)

    बिग बॉस 18 च्या चकचकीत ट्रॉफीची सर्वत्र चर्चा; असं काय खास आहे या ट्रॉफीमध्ये?

    Bigg Boss 18: लोकप्रिय शो ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले कलर्स टीव्हीवर रात्री 9.30 वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या सीझनचा विजेता सलमान खान घोषित करणार आहे. दरम्यान बिग बॉस 18 चा विजेता कोण असणार याबद्दल तर सर्वांना आतुरता आहेच पण प्रेक्षकांना आतुरता ही बिग बॉस 18 च्या ट्रॉफीचीसुद्धा आहे. बिग बॉस 18 च्या चकचकीत ट्रॉफीची सर्वत्र चर्चा होत आहे. तर पाहा यंदाच्या या ट्रॉफीमध्ये नक्की खास काय असणार?

    यंदाच्या या ट्रॉफीमध्ये नक्की खास काय असणार? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

  • 19 Jan 2025 04:12 PM (IST)

    कोणत्या दोन स्पर्धकांमध्ये तगडी टक्कर?

    ‘बिग बॉस 18’ या सिझनच्या सुरुवातीपासूनच करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना हे दोघं तगडे स्पर्धक मानले जात आहेत. मात्र एक्सवरील (ट्विटर) आताचा ट्रेंड पाहता रजत दलाल आणि विवियन डिसेना यांच्यात अंतिम चुरस रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 19 Jan 2025 04:09 PM (IST)

    ग्रँड फिनालेमध्ये आमिर खान आणि अक्षय कुमार

    अभिनेता अक्षय कुमार आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वीर पहारिया त्यांचा आगामी ‘स्कायफोर्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ग्रँड फिनालेमध्ये येणार आहेत. याशिवाय आमिर खान, त्याचा मुलगा जुनैद खान, खुशी कपूरसुद्धा फिनालेमध्ये येणार असल्याचं कळतंय.

  • 19 Jan 2025 04:05 PM (IST)

    ‘बिग बॉस 18’च्या विजेत्याला बक्षीस किती?

    ‘बिग बॉस 18’च्या विजेत्याला 50 लाख रुपये बक्षीस आणि ट्रॉफी मिळणार आहे. मात्र फिनालेमध्ये ब्रीफकेसची ऑफर दिल्यास बक्षीसाची ही रक्कम कमी होऊ शकते.

  • 19 Jan 2025 03:58 PM (IST)

    कधी आणि कुठे पाहता येणार ग्रँड फिनाले?

    ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले कलर्स टीव्हीवर रात्री 9.30 वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास अडीच ते तीन तासांच्या कार्यक्रमानंतर या सिझनचा विजेता सलमान खान घोषित करणार आहे. प्रेक्षकांना जियो सिनेमा आणि जियो टीव्हीवरही लाइव्ह एपिसोड पाहता येणार आहे.

Published On - Jan 19,2025 3:56 PM

Follow us
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.