Bigg Boss 19 Grand Finale : टॉप 5 मधून दोन जण बेघर; चाहत्यांना बसला धक्का!

Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांचं एलिमिनेशन झाल्याची माहिती समोर येत आहे. टॉप 5 मधून दोन लोकप्रिय स्पर्धकांना बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे आता तिघांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे.

Bigg Boss 19 Grand Finale : टॉप 5 मधून दोन जण बेघर; चाहत्यांना बसला धक्का!
bigg boss 19 Grand Finale
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 07, 2025 | 9:25 PM

Bigg Boss 19 Grand Finale : ‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले एपिसोड सुरू झाला असून यंदाचा विजेता कोण ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या या सिझनची अखेर आज (7 डिसेंबर 2025) सांगता होणार आहे. गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल हे स्पर्धक टॉप 5 मध्ये पोहोचले आहेत. यापैकी बिग बॉसची ट्रॉफी कोण आपल्या नावे करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धक बाद झाले आहेत. त्यामुळे टॉप 3 मध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे. ताज्या अपडेट्सनुसार, दोन चर्चेतल्या स्पर्धकांना बिग बॉसचं घर सोडावं लागलं आहे.

‘हिदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, गायक अमाल मलिकला आधी बिग बॉसचं घर सोडावं लागलं आहे. त्यानंतर स्पिरीच्युअल इन्फ्लुएन्सर तान्या मित्तलचं एविक्शन झालं. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आता फक्त गौरव खन्ना, प्रणित मोरे आणि फरहाना भट्ट हे तीन स्पर्धक राहिले आहेत.

अमाल मलिक हा बिग बॉस 19 मधील स्ट्राँग स्पर्धक मानला जात होता. बिग बॉसच्या घरातील त्याचा प्रवास अत्यंत रंजक होता. कधी विनोदबुद्धीने तर कधी रागाने त्याने आपली खेळी इतरांपेक्षा वेगळी ठेवण्याचा प्रयत्न केला. बशीर अली, शहबाज गिल, झीशान कादरी यांच्यासोबत त्याची जोडी चांगली रंगली. अमाल मलिकच्या गँगच्या मस्तीला प्रेक्षकांनीही खूप एंजॉय केलं. याशिवाय संगीतकार अमाल मलिकचा रागसुद्धा प्रेक्षकांना प्रसंगी पहायला मिळाला. फरहाना भट्टसोबत त्याची अनेकदा भांडणं झाली. इतकंच नव्हे तर प्रणित मोरेशीही तो कित्येकदा भिडला. एका एपिसोडमध्ये त्याने अभिषेक बजाजला मारहाणसुद्धा केली.

दुसरीकडे तान्या मित्तल तिच्या बडेजाव करण्याच्या स्वभावामुळे चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरात 800 साड्या आणण्यापासून, 150 बॉडीगार्ड्स आणि फाइव्ह स्टार हॉटेलसारखं घर यांसारख्या बढायांमुळे तान्याने कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा व्हालं लागलं होतं. तान्या अनेकदा तिच्या ड्रामेबाज स्वभावामुळे चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरात फरहानासोबत तिची अनेकदा भांडणं झाली.