AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 : यंदाच्या सिझनमध्ये ‘या’ 5 मोठ्या गोष्टी दिसल्याच नाहीत, तरी ठरला लोकप्रिय

Bigg Boss 19 : यंदाच्या बिग बॉसच्या सिझनमध्ये पाच अशा मोठ्या गोष्टी दिसल्याच नाहीत, ज्या आधीच्या सिझनमध्ये खूप लोकप्रिय होत्या. तरीसुद्धा एकोणिसावा सिझन इतर सिझन्सपेक्षा हटके ठरला. या पाच गोष्टी कोणत्या, ते जाणून घेऊयात..

Bigg Boss 19 : यंदाच्या सिझनमध्ये 'या' 5 मोठ्या गोष्टी दिसल्याच नाहीत, तरी ठरला लोकप्रिय
bigg boss 19Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 07, 2025 | 7:44 PM
Share

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या एकोणिसाव्या सिझनची सांगता आज (7 डिसेंबर 2025) होणार आहे. यंदाच्या सिझनचं विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉसचा हा सिझन मागील 18 सिझन्सपेक्षा खूप वेगळा ठरला. या संपूर्ण सिझनदरम्यान असे काही ट्विस्ट अँड टर्न्स पहायला मिळाले, जे याआधी कधीच घडले नव्हते. स्पर्धकांच्या गेम प्लॅनपासून ते निर्मात्यांच्या नवीन रणनीतींपर्यंत.. या सिझनने प्रत्येक आठवड्याला प्रेक्षकांना सरप्राइज दिले. काही टास्क, निर्णय आणि सरप्राइज पहिल्यांदाच पहायला मिळाले. आज आम्ही तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे हा सिझन इतर सिझन्सपेक्षा हटके ठरला.

रोमँटिक कपल बनलं नाही

यंदाच्या सिझनची खास गोष्ट म्हणजे यावेळी बिग बॉसच्या घरात कोणतंच रोमँटिक कपल बनलं नाही. गेल्या अनेक सिझनमध्ये नेहमीच कोणती ना कोणती लव्हस्टोरी पहायला मिळत होती. प्रिन्स नरुला-युविका चौधरी, सारा खान-अली मर्चंट, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्रा यांसारख्या जोड्या बिग बॉसमुळे प्रकाशझोतात आल्या. परंतु यावेळी स्पर्धकांनी त्यांच्या खेळीवर आणि योजनेवर अधिक लक्ष केंद्रीत केलं. त्यामुळे रोमान्सचा तडका यंदा कमी होता.

कॅप्टननेही केली ड्युटी

बिग बॉस 19 मध्ये यंदा कॅप्टनलाही ड्युटी करावी लागत होती. शाहबाज, बादशाह, मृदुल तिवारी आणि गौरव खन्ना यांसारख्या स्पर्धकांनी कॅप्टन बनल्यानंतरही घरातील इतर जबाबदाऱ्या पार पाडल्या. आधीच्या सिझन्समध्ये कॅप्टन कोणतीच कामं करत नव्हता.

यंदाच्या सिझनमध्ये नव्हता जेल

बिग बॉस 12, 15 आणि 16 सिझन्सच्या स्पर्धकांना घरातील नियम मोडल्यानंतर शिक्षा म्हणून तुरुंगात बसावं लागत होतं. परंतु यंदाच्या सिझनमध्ये असं काहीच झालं नाही. कोणालाच तुरुंगात जावं लागलं नाही किंवा कोणालाच शिक्षाही झाली नाही.

पहिल्याच दिवशी स्पर्धक बेघर

बिग बॉस 19 मध्ये सर्वांत आश्चर्यकारक घटना पहिल्याच दिवशी घडली. स्पर्धकांनी फरहाना भट्टला बेघर करण्यासाठी नॉमिनेट केलं. परंतु तिला पूर्णपणे घरातून काढण्याऐवजी निर्मात्यांनी तिला सीक्रेट रुममध्ये पाठवलं होतं. याआधीच्या सिझनमध्ये असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे या सिझनच्या सुरुवातीलाच ड्रामा आणि वाद पहायला मिळाला होता.

कोणतीच डिनर डेट झाली नाही

बिग बॉस 19 मध्ये कोणतीच डिनर डेट झाली नाही. आधीच्या सिझनमध्ये नेहमीच स्पर्धक आणि त्यांच्या पार्टनरसोबत रोमँटिक डिनर डेट पहायला मिळत होती. उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना हेसुद्धा रोमँटिक डिनर डेटचा आनंद घेताना दिसले होते. बनी जे आणि गौरव चोप्रा यांनासुद्धा एका टास्कदरम्यान स्पेशल डिनर डेटची संधी मिळाली होती. रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लासुद्धा डिनर डेटवर गेले होते. परंतु या सिझनमध्ये असं काहीच घडताना दिसलं नाही.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....