AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20: डिवोर्स स्पेशल..; माही विजने ‘बिग बॉस 20’बद्दल केलं असं वक्तव्य; ऐकून स्पर्धकही वैतागले

Bigg Boss 20: शोमध्ये पुढील काळात या तिघींच्या भूतकाळाबद्दल आणखी कोणते खुलासे होतात आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचा खेळावर काय परिणाम होतो, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss 20: डिवोर्स स्पेशल..; माही विजने 'बिग बॉस 20'बद्दल केलं असं वक्तव्य; ऐकून स्पर्धकही वैतागले
माही विज, जय भानुशालीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2026 | 6:46 PM
Share

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’च्या घरात स्पर्धकांमधील नातेसंबंध, वैयक्तिक आयुष्य आणि भूतकाळ यावर चर्चा सुरू झाली आहे. शोच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच काही स्पर्धक आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहेत. अभिनेत्री माही विज हिनेही शोबद्दल एक वक्तव्य केलं असून, त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. माही विजने ‘बिग बॉस’च्या घरात बोलताना या सिझनला थेट ‘डिव्होर्सी स्पेशल’ (Divorcee Special) असं म्हटलं. विशेष म्हणजे हे म्हणताना तिने स्वतःसोबत ईशा रिखी आणि मेरी कोम यांचाही उल्लेख केला. माहीच्या या टिप्पणीवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

माही विज, ईशा रिखी आणि मेरी कोम या तिघींच्या वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधांमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. ‘बिग बॉस 20’मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा हा पैलू पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. माहीने याच परिस्थितीवर भाष्य केलं. माहीच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या.

बिग बॉसच्या घरात माहीला कोणत्या प्रकारच्या गप्पा करायला आवडतात, असं विचारण्यात आलं असता तिने ईशा रिखीला म्हटलं, “बाहेर कोणाचं कोणासोबत अफेअर सुरू आहे, ते मला सांग. सेटवर तीन घटस्फोटित आहेत. तू, मी आणि ती बॉक्सर (मेरी कॉम). आपली सेकंड इनिंग सुरू आहे. हा तर ‘डिव्होर्सी स्पेशल’ आहे.” हे ऐकल्यावर ईशा मात्र तिच्या घटस्फोटाबद्दल बोलण्यास फारशी इच्छुक नव्हती. “अनेक लोक मला ओळखत नाहीत, कारण मी नेहमीच माझं वैयक्तिक आयुष्य थोडं खासगी ठेवलं आहे,” असं तिने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by @bigg____boss20

ती पुढे म्हणाली, “लोकांनी मला कोणाची गर्लफ्रेंड किंवा कोणाची पत्नी म्हणून ओळखावं, असं मला वाटत नाही. मला माझ्या नावाने आणि माझ्या स्वतंत्र ओळखीने प्रसिद्ध व्हायचं आहे.” माहीने मेरी कोमलाही तिच्या घटस्फोटाबाबत प्रश्न विचारला. मात्र, मेरी कोमनेही या विषयावर चर्चा करण्यास नकार दिला. त्यानंतर माहीने स्पष्ट केलं की, आपल्या एक्स पार्टनरबद्दल वाईट किंवा कठोर बोलणं गरजेचं नाही. अखेर ईशाने माहीला थेट प्रश्न विचारला की, “जेव्हा आम्हाला घटस्फोटाबद्दल बोलायचंच नसेल, तर तू आम्हाला त्याबद्दल बोलण्यासाठी एवढा दबाव का टाकतेयस?” त्यामुळे दोघींमध्ये या मुद्द्यावर काहीशी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.

ईशा रिखीच्या वैयक्तिक आयुष्याचीही ‘बिग बॉस 20’च्या प्रीमिअरपासून चर्चा होत आहे. शोमध्ये आपल्या भूतकाळाबद्दल बोलताना ईशा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सलमान खानने तिला आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला. ईशाच्या डोळ्यात अश्रू आल्यानंतर सलमानने ब्रेकअप प्रत्येकाच्या आयुष्यात होऊ शकतो, असं सांगत वैयक्तिक समस्या सार्वजनिक करण्याची गरज नसल्याचं म्हटलं. “ती वेळ संपली. मूव्ह ऑन,” अशा शब्दांत त्याने ईशाला समजावलं.

‘बिग बॉस’च्या प्रत्येक सिझनमध्ये स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याला मोठं महत्त्व मिळतं. नाती, ब्रेकअप, लग्न आणि कुटुंबाशी संबंधित अनुभव अनेकदा घरातील चर्चेचा विषय बनतात. ‘बिग बॉस 20’मध्येही सुरुवातीपासूनच अशा विषयांना उधाण आलं आहे.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?