AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss फेम अभिनेत्रीचं भयानक रिलेशनशिप; म्हणाली, तो सतत लाथेनं मारायचा… दुसऱ्या मुलीसमोर मारलं त्यानंतर…

'बिग बॉस' फेम अभिनेत्री नको झालेलं असं रिलेशनशिप...., म्हणाली, 'तो बेदम मारहाण करायचा... सतत लाथेनं मारायचा... एकदा तर, दुसरी मुलगी घरी घेवून आला, तिच्यासमोर मला मारलं त्यानंतर...', भयानक होता अभिनेत्रीचा भूतकाळ

Bigg Boss फेम अभिनेत्रीचं भयानक रिलेशनशिप; म्हणाली, तो सतत लाथेनं मारायचा... दुसऱ्या मुलीसमोर मारलं त्यानंतर...
Archana Gautam
| Updated on: Feb 28, 2026 | 2:05 PM
Share

झगमगत्या विश्वातील अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यात किती कठीण परिस्थितीचा सामना करतात. सगळ्यात अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात आनंद नसतो… काही अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यात फक्त आणि फक्त वेदना असतात. असचं काही बिग बॉस गाजवलेल्या अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. सध्या सुरु असलेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीला त्रासदायक रिलेशनशिपचा सामना करावा लागलेला. त्या रिलेशनशिपमध्ये अभिनेत्रीने मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केला… अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड तिला बेदम मारहाण करायचा. लाथेनं देखील सतत मारायचा. एवढंच नाही तर, एकदा त्याने दुसऱ्या मुलीला घरात आणलं तिच्यासमोर अभिनेत्रीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मोठ्या संकटातून अभिनेत्रीला तिच्या कुटुंबियांनी बाहेर काढलं… सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अर्चना गौतम आहे. सध्या अर्चना Top 50 मध्ये दमदार खेळताना दिसत आहे. शोमध्ये युविका चौधरी हिला स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल सांगत असताना अर्चना भावूक झाली. ज्याला मी माझं सर्वस्व दिलं त्याने मला फक्त आणि फक्त मार दिला… पण सगळ्यातून बाहेर पडून मी माझं करियर केलं…

अर्चना म्हणाली, ‘शोमध्ये मी बोल्ड दिसते, पण प्रेमात मी इमोशनल होते… तो फार चांगला दिसत नव्हता… मी त्याला हिरो केलं… त्याच्या बहिणीला पूर्णपणे ग्रूम केलं… मी 24 तास फक्त त्याच्यासोबत असायचे… त्याच्यासाठी मी सगळं केलं आहे… त्याला 100 नवीन कपडे आणले… पण त्याने मला काय दिलं फक्त मार…’

यावर सल्ला देत युविका म्हणाली, ‘तुला कोणी चपलेने मारेल हे कोणतं प्रेम असतं? स्वतःचं मानसिक आरोग्य गमावण्याआधी स्वतःवर प्रेम करणं फार गरजेचं आहे… जेव्हा तू स्वतःवर प्रेम करशील, तेव्हा सर्व गोष्टी आपोआप बदलतील…’, यावर अर्चना म्हणाली, ‘मी माझं मानसिक आरोग्य गमावलं होतं. पण आता मी नव्याने उभी राहिली आहे.’

पुढे अर्चना म्हणाली, ‘तो मला मारायचा तेव्हा मी जोरात ओरडायचे… सगळ्यांना बोलवेन असं म्हणायचे तेव्हा तो मला आणखी मारायचा… एकदा तो दुसऱ्या मुलीला घरी घेवून आला आणि त्याने तिच्यासमोर मला मारण्याची सुरुवात केली. तेव्हा ती मुलगी घाबरून पळून गेली…’. असं देखील अर्चना हिने सांगितलं..

Follow Us
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील.
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं.
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे.
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ.
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....