Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेची पुन्हा बिग बॉसच्या घरात एण्ट्री

शिवानी सुर्वे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. "बिग बॉसनं माझं ऐकलं नाही, तर मी कायदेशीर कारवाई करेन अशी थेट धमकी शिवानीनं बिग बॉसला दिली.

Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेची पुन्हा बिग बॉसच्या घरात एण्ट्री

Bigg Boss Marathi 2 मुंबई : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून लोकप्रियता मिळाली आहे. या पर्वातील प्रत्येक स्पर्धक उत्तम प्रकारे आपले टास्क पूर्ण करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरेला काही कारणास्तव बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले. पण त्यानंतर आता शिवानी सुर्वे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवानी सुर्वे पुन्हा घरात एण्ट्री करणार असल्याच्या चर्चेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात शिवानी स्पष्टपणे आपले मुद्दे मांडणे, घरात अनेकदा वाद घालणे आणि आपला टास्क पूर्ण करणे यामुळे तिला फार कमी वेळेत लोकप्रियता मिळाली.

मात्र काही दिवसांपूर्वी “बिग बॉसच्या घरातील भांडणांमुळे, राग अनावर होण्यामुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे मला या घरात राहायचं नाही”, असं शिवानीने बिग बॉसला कॅमेऱ्यासमोर येत सांगितलं होतं. त्याशिवाय जर बिग बॉसनं माझं ऐकलं नाही, तर मी कायदेशीर कारवाई करेन अशी थेट धमकी शिवानीनं बिग बॉसला दिली होती.” त्यानंतर 15 जूनला बिग बॉसने तिची हकालपट्टी केली होती.

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

त्यानंतर शिवानीने मी पुन्हा बिग बॉसच्या घरात येऊ इच्छिते असं म्हटलं होतं. तब्येतीचे कारण देत शिवानीने बिग बॉसचे घर सोडले होते. मात्र जितके दिवस शिवानी घरात होती,तितके दिवस तिने अगदी चांगल्या पद्धतीने टास्क पूर्ण केले. तिच्या या खेळाडू वृत्तीमुळे अनेकजण तिचे चाहते झाले होते.

त्यामुळे ती पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये येऊ शकते अशी चर्चा रंगली आहे. मात्र यावर बिग बॉसने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दरम्यान शिवानी जर पुन्हा बिग बॉसच्या घरात आली, तर कार्यक्रमाला वेगळे वळण मिळू शकेल. शिवानी येत्या विकेन्डच्या डावात बिग बॉसच्या घरात पुन्हा पदार्पण करेल, असं म्हटलं जात आहे.दरम्यान शिवानी खरचं बिग बॉसच्या घरात पदापर्ण करणार का हे मात्र आज (13 जुलै) विकेन्डच्या डावात स्पष्ट होईल.

पाहा बिग बॉस मराठी-2 च्या सर्व बातम्या :

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त  

Bigg Boss Marathi-2 : शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरली

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *