वर्षा उसगांवकर यांना रितेश देशमुख याने दाखवला आरसा, मोठे विधान करत म्हणाला, तुम्ही…
बिग बॉस मराठी सीजन 5 चांगलेच चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे नुकताच रितेश देशमुख याने घरातील सदस्यांचा क्लास लावला. रितेश देशमुख याच्याकडून जान्हवी किल्लेकर हिला मोठी शिक्षा सुनावण्यात आलीये. पुढील काही दिवस तिला जेलमध्ये राहवे लागणार आहे.
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी घरातील अनेक सदस्यांचा क्लास लावताना रितेश देशमुख हा दिसला. हेच नाही तर जान्हवी किल्लेकरला भाऊच्या धक्क्यामध्ये न बसू देण्याचाही निर्णय रितेश देशमुख याने घेतला. पॅडी कांबळेच्या अभिनयावर वादग्रस्त विधान जान्हवी हिने केले. ज्यानंतर तिने पॅडी कांबळेची माफी देखील मागितली. मात्र, रितेश देशमुख याने जान्हवीचा चांगलाच क्लास लावला. आता जान्हवीला जेलची शिक्षा देखील देण्यात आलीये.
यावेळी निकी तांबोळी, अंकिता, अरबाज पटेल यांचा क्लास रितेश देशमुख यांच्याकडून लावण्यात आला. हेच नाही तर रितेश देशमुख याने निकी तांबोळी हिला थेट म्हटले की, पुढच्या आठवड्यात तू अशीच वागत राहिली तर जेलची शिक्षा तुलाही होऊ शकते. निकी तांबोळीच्या मागे अरबाज बोलत असतो हे देखील रितेशने सांगितले.
दुसरीकडे रितेश देशमुख हा वर्षा उसगांवकर यांना देखील आरसा दाखवताना दिसला. वर्षा उसगांवकर यांना रितेश देशमुख म्हणाला की, वर्षाजी तुम्ही कुठे गायब आहात. बिग बॉसच्या घरात तुम्ही दिसत नाहीयेत. एक ते दोन गोष्टी सोडल्या तर तुम्ही पूर्णपणे गायब आहात. सुरूवातीच्या आठवड्यात तुमचा चांगला गेम दिसला.
मागच्या आठवड्यात देखील तुम्ही दिसत नव्हता. मी भाऊच्या धक्क्यामध्ये तुम्हाला अजिबात बोललो नाही. मी ज्यांना भाऊच्या धक्क्यामध्ये बोलतो ते स्पर्धेक आठवडाभर चर्चेत असतात, अशा लोकांनाच मी बोलतो. मी मागच्या आठवड्यातही तुम्हाला बोललो नाही आणि आताही नाहीये. तुमचा गेम बिग बॉसच्या घरात दिसत नसल्याचे रितेश याने म्हटले.
वर्षा उसगांवकर यांना रितेश देशमुख याने आरसाच दाखवला आहे. सुरूवातीला वर्षा उसगांवकर या चर्चेत होत्या. मात्र, आता त्या बिग बॉसच्या घरात दिसत नाहीयेत. वर्षा उसगांवकर या रितेश देशमुख याला याबद्दल स्पष्टीकरण देताना देखील दिसल्या. रितेश देशमुख याने निकी तांबोळी आणि तिच्या टीमला थेट सांगितले की, अंकिता आणि धनंजय तुमच्या टीममध्ये भांडणे लावून देत आहेत आणि निकी तू त्यामध्ये फसत आहेस.