वर्षा उसगांवकर यांनी केला अखेर ‘त्या’ गोष्टीवर मोठा खुलासा, ढसाढसा रडत म्हणाल्या, त्यावेळी माझ्यासाठी…
वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सहभागी झाल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे वर्षा उसगांवकर आहे. वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे धमाकेदार गेम खेळतानाही वर्षा उसगांवकर या दिसत आहेत. वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला असून अनेक हीट चित्रपट त्यांनी दिले आहेत. वर्षा उसगांवकर यांनी महाभारत मालिकेतही महत्वाची भूमिका केली. सध्या बिग बॉस मराठी सीजन 5 मधील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे वर्षा उसगांवकर यांचे आहे. सुरूवातीला बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना वर्षा उसगांवकर या दिसल्या. निकी तांबोळी आणि त्यांच्यामध्ये जोरदार वाद देखील बिग बॉसच्या घरात झाल्याचे बघायला मिळाले.
आर्या जाधव ही बिग बॉसच्या घरात एकटी शांत बसली होती. यावेळी वर्षा उसगांवकर या तिच्याजवळ जातात आणि असे एकटे शांत बसण्याचे कारण विचारतात. यावेळी आर्या ही आपल्याला बिग बॉसच्या घरात राहायचे नसून बाहेर जायचे सांगताना दिसली. हेच नाही तर आपल्याला घरातील लोकांनी वाळित टाकल्याचेही तिने सांगितले.
यावेळी वर्षा उसगांवकर या म्हणाल्या की, मी ज्यावेळी कॉलेजमध्ये गेले, त्यावेळी काही मुलींनी मलाही असेच वाळीत टाकले होते. मी कोणालाही बोलत नव्हते. हेच नाही तर मला काहीही बोलायचे म्हटले की, मी घाबरत. त्यानंतर मी बंडखोरी केली…मला माहिती आहे की, आपल्याला कोणी वाळीत टाकले की, कसे होते.
हे म्हणत वर्षा उसगांवकर या चक्क रडताना दिसल्या. आर्या हिला गळ्याला लावत ढसाढसा रडताताना वर्षा उसगांवकर या दिसल्या. कॉलेजमधील जुने दिवस आठवत वर्षा उसगांवकर रडल्या. त्यावेळी आपल्यासोबत काय व्हायचे हे देखील वर्षा उसगांवकर यांनी सांगितले. आता वर्षा उसगांवकर यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात कायमच सर्वांना समजून सांगताना दिसतात. हेच नाही तर निकी तांबोळी आणि अरबाज खान यांच्यामध्ये सुरू असलेला वाद देखील थांबवताना वर्षा उसगांवकर या दिसल्या. यावेळी वर्षा उसगांवकर यांनी निकी तांबोळी हिला काही गोष्टी समजून सांगितल्या. सुरूवातीच्या काळात वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यात जोरदार वाद बघायला मिळाला होता.