
बिग बॉस मराठीचं 5 व पर्व गाजवून आणि ते जिंकून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणारा सूरज चव्हाण (Suraj Chavan) हा यशाच्या शिखरावर एक एक पाऊल टाकताना दिसत आहे. बिग बॉस जिंकल्यावर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ‘झापूक झुपूक’ सिनेमातून त्याने मोठ्या पडद्यावरही पदार्पण केलं, आता लवकरच तो त्याच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार आहे. नोव्हेंबर अखेरीस तो मामाची लेक, संजना हिच्ासोबत लग्नगाठ बांधणार आहे. हळूहळू त्याची एकेक स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात जाण्यापूर्वी त्याने आणखी एक स्वप्न पाहिलं होतं, ते म्हणजे आपलं हक्काचं घर असावं हे. आणि तेच स्वप्न आता पूर्ण झालं असून सूरज चव्हाणचं नवंकोरं घर बांधून तयार आहे, त्याचा गृहप्रवेश सोहळाही नुकताच पार पडला.
घराचं स्वप्न साकार
येत्या 29 नोव्हेंबरला सूरज चव्हाणचं संजना हिच्याशी लग्न होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी तर सुरू झाली आहेत, त्याचे होणाऱ्या पत्नीसोबत जाऊन दागिने, साड्या यांची खरेदी केली. कोकण हार्टेड गर्ल, अंकिता प्रभु वालावलकर हिच्याकडे त्यांचे कळवण झालं, तिनेच त्यांना खरेदीसाठीही मदत केली, ते सगळेच व्हिडीओ सूरजच्या ऑफिशिअल अकाऊंटवर शेअर करण्यात आले असून चाहत्यांनीत्यावर लाईक्स, कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला.
Suraj Chavan : सूरज चव्हाणचं लव्ह मॅरेज की अरेंज ? या दिवशी चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीखही समोर
पण आत सूरजने पाहिलेलं एक मोठ्ठ स्वप्नही पूर्ण झालं आहे. आपलं हक्काचं घरं असलावं ही त्याची इच्छा होती, ती अखेर पूर्ण झाली. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्याच्या घराचं बांधकाम सुरू होतं, त्याचा एक व्हिडीओ देखील सूरजने त्याच्या अकाऊंटवर शेअर केला होता. बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर गावात हक्काचं घर बांधण्याची इच्छा सूरजने बोलून दाखवली होती. इतकंच नव्हे तर त्या घराला ‘बिग बॉस’ असं नाव देणार असल्याचंही तो म्हणाला होता. त्याच घराच्या बांधाकामाचा व्हिडीओ शेअर केल्यावर त्यावर काही क्षणात शेकडा लाईक्स आल्या.
सूरज चव्हाणने केला गृहप्रवेश
आता सूरजच्या त्याचं घराचं बांधकाम पूर्ण झालं असून त्याने नुकता गृहप्रवेशही केला. याचा एक डिटेल व्हिडीओ सूरजने त्याच्या अकाऊंटवर शेअर केला असून त्यामध्य़े त्याच्या सुंदर घराची पूर्ण झलक दिसत आहे. अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं त्याचं घर हे क्लासी लूकचं आहे, पण सूरजच्या साधेपणाने त्याला आपुलकीचं वातावरणही मिळालं. त्याच्या कुटुंबियांसोबत केलेला गृहप्रवेश, देवाची तस्बीर हाथी घेऊन त्यांना दाखवलेलं संपूर्ण घर, पूजा, आरती, असं सगळं या व्हिडीओमध्ये नीट कॅप्चर झालं असून घराच्या स्वप्नपूर्तीचा आनंद सूरजच्या चेहऱ्यावर साफ झळकत आहे.
चाहत्यांनी या व्हिडीओवर देखील लाईक्स, कमेंट्सटचा वर्षाव केला आहे. ‘एका छोट्याश्या घरातून सुरू झालेला तुझा प्रवास आज तुझ्या हक्काच्या वास्तूत होतोय सूरज 😇✨,तुझ्यासाठी खरच खूप आनंद आहे’ अशी कमेंट एकाने केली आहे. गरीब घरातून आलेला एखादा माणूस आयुष्यात जिंकतो…तेव्हा त्याचं यश आपलंही वाटतं. अभिनंदन भाऊ— मनापासून खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत दुसऱ्या चाहत्याने सूरजा शुभेच्छा दिल्या आहेत. ४ लोक काय म्हणतील? तीच ४ लोक आज कमेंट करून त्याची स्तुती करताय. Be you. The world will adjust अशी कमेंट आणखी एकाने केली आहे. एकंदरच सूरजच्या चाहत्यांना त्याचं हे घर खूप आवडलं असून सूरजचं घराच स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांनाह खूप आनंद झाला आहे. त्यांनी भरभरून कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.