Suraj Chavan : सूरज चव्हाणचं लव्ह मॅरेज की अरेंज ? या दिवशी चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीखही समोर
सूरज आयुष्याची नवी सुरूवात करत असून त्याची पुढची इनिंग सुरू होत आहे. तो लवकरच बोहोल्यावर चढणार असून नुकताच त्याच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा आणि नाव सर्वासमोर आलं. त्याच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

बिग बॉस हिंदीप्रमाणेच त्याचं मराठी पर्वही खूप गाजतं. बिग बॉस मराठीच्या 5 व्या पर्वाचा विजेता ठरलेला सूरज चव्हाण हा त्याच्या स्वभावामुळे लोकांच्या मनात भरला, त्याने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करत या रिॲलिटी शोचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर तो केदार शिंदे यांच्या झापूक झुपूकमधून मोठ्या पडद्यावरहूी आला. हा चित्रपट फारसा चालला नसला तरी सूरज चव्हाणची हवा आजही कायम असून सोशल मीडियावर त्याचे 25 लाखांहाून ्धिक फॉलोअर्स आहेत. त्याचं काम, वैयक्तिक आयुष्य याचे अपडेट्स सूरज त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
आता हाच सूरज आयुष्याची नवी सुरूवात करत असून त्याची पुढची इनिंग सुरू होत आहे. तो लवकरच बोहोल्यावर चढणार असून नुकताच त्याच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा आणि नाव सर्वासमोर आलं. बिग बॉसमधील अजून एक स्पर्धक अंकिता वालावलकर अर्थआत कोकण हार्टेड गर्लने सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचं केळवण केलं. त्याचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करण्यात आला तेव्हा सूरजची होणारी पत्नी सर्वांना दिसली. संजना असं तिचं नाव असून सूरजने खास उखाणा घेत तिच्या नावाचा उलगडा चाहत्यांसमोर केला होता. हा व्हिडीओ, त्यांच केळवण, त्यांची जोडी सर्वांनाच खूप आवडली असून व्हिडीओवर असंख्य लाईक्स आणि कमेंट्सही आल्यात.
सूरजच्या लग्नाची तारीख कधी ?
मात्र आता या जोडीबद्दल आणखी जाणून घ्यायची सुद्धा चाहत्यांना उत्सुकता असून सूरजचं लग्न कसं ठरलं, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आणि लग्न नेमकं कोणत्या तारखेला, कुठे होणार ? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात असून त्या सर्वांची उत्तर आता समोर आली आहेत.
सूरजच्या लग्नाला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी सूरज आणि संजना यांच लग्न होणार आहे. त्या दोघांचा हा पारंपारिक विवाहसोहळा पुण्याजवळच्या जेजूरी, सासवड येथे थाटात पार पडणार आहे. 28 नोव्हेंबरपासून लग्नाच्याआधीचे काही विधी सुरू होणार असून हळद, मेहदी आणि संगीतही होणार आहे. लग्नापूर्वी जोरदार तयारी चालली असून सूरजच्या घरीचीही खास सजावट सुरू आहे.
Suraj Chavan : सूरज चव्हाणची होणारी पत्नी कोण ? अखेर चेहरा दिसलाच.. अंकिताने थाटात केलं केळवण
View this post on Instagram
सूरजचं लव्ह मॅरेज की अरेंज ?
अंकिता प्रभ वालावलकर अर्थात कोकण हार्टेड गर्लने सूरज-संजनाचं नुकतंच केळवण केलं. आता तिनेच लोकमत सखीशी बोलताना सूरजच्या लग्नाबद्दल आणखी माहिती दिली. सूरज चव्हाणची होणार पत्नी संजना , ही सूरजच्या चुलत मामाचीच लेक आहे. विशेष म्हणजे, त्या दोघांचं हे अरेंज मॅरेज नसून चक्क लव्ह मॅरेज आहे, दोघंही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात चुलत मामाच्या बहिणीशी सूरज हा 29 नोव्हंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे असं अंकिताने सांगितलं. त्या दोघांच्या लग्नाबद्दल चाहते खूप उत्सुक असून , केळवणाच्या व्हिडीओवरही शेकडो कमेंट्स करत या जोडप्याला भावी आयुष्यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
