AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस मराठी 6’ विनर तन्वी कोलते अडकणार लग्नबंधनात, पण कोणासोबत? अभिनेत्रीने सर्वकाही सांगितलं

Tanvi Kolte Marriage: 'बिग बॉस मराठी 6' विनर तन्वी कोलते खासगी आयुष्यामुळे चर्चेत, अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, पण कोण आहे नवरा मुलगा? तिने सर्वकाही सांगितलं..., सध्या सर्वत्र तन्वीच्या वक्तव्याची चर्चा...

'बिग बॉस मराठी 6' विनर तन्वी कोलते अडकणार लग्नबंधनात, पण कोणासोबत? अभिनेत्रीने सर्वकाही सांगितलं
अभिनेत्री तन्वी कोलते
| Updated on: Apr 26, 2026 | 11:01 AM
Share

Tanvi Kolte Marriage: ‘बिग बॉस मराठी 6’ विनर आणि अभिनेत्री तन्वी कोलते हिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होताना दिसत आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वी हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. चाहत्यांची संख्या वाढल्याने तन्वीच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात असताना तन्वी अनेकदा म्हणालेली की, माझ्याबद्दल काहीही बोलू नका, मला बाहेर जाऊन लग्न करायचं आहे असं म्हटलं होतं. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर खुद्द तन्वी हिने लग्न आणि खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

‘बिग बॉस मराठी 6’ संपल्यानंतर तन्वी कोलते कोणासोबत लग्न करणार? अशा चर्चांनी जोर धरलेला. यावर आता तिने स्पष्ट उत्तर दिलं आहे. तन्वी म्हणाली, ‘मला सर्वात आधी माझ्या करियरसोबत लग्न करायचं आहे… मी पहिल्या दिवसापासून म्हटलं होतं की, शोमध्ये अफेअर वैगरे असं काहीही करणार नाही… लव्ह अँगल देणार नाही.

तन्वी पुढे म्हणाली, तीन महिन्यांमध्ये कोणाला प्रेम होत नाही… मला तर बिलकूल होणार नाही… त्यामुळे माझं ठरलेलं होतं की, मी एकटी जाणार आणि एकटी बाहेर पडणार आणि छान खेळणार…..’, एवढंच नाहीतर, यावेळी तन्वी हिने लग्नाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.

तन्वी म्हणाली, ‘मी कायम एकट गोष्ट सांगत आली आहे आणी ती म्हणजे माझी मम्मी माझ्यासाठी एक चांगला मुलगा बघणार आहे…. मला सगळे फटकळ म्हणतात, बिनधास्त म्हणतात… पण खरं तर मी खूप जुन्या विचारांची आहे. ज्या मुसासोबत माझी मम्मी लग्न ठरवेल, त्या मुलासोबत मी लग्न करेल… काही कोणतंच सिक्रेट नाही.’ असं देखील तन्ववी म्हणाली.

‘बिग बॉस’ संपल्यानंतर तन्वी आता कोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तन्वी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश