AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 6 Winner : रत्नागिरीची तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ची महाविजेती

Bigg Boss Marathi 6 Winner : शंभर दिवसांचा प्रवास, प्रतीक्षा संपली असून अटीतटीच्या सामन्यातून महाराष्ट्राला महाविजेता मिळाला आहे. उत्कंठावर्धक वातावरणात ‘बिग बॉस मराठी सिझन 6’चा विजेता घोषित करण्यात आला.

Bigg Boss Marathi 6 Winner : रत्नागिरीची तन्वी कोलते ठरली 'बिग बॉस मराठी 6'ची महाविजेती
bigg boss marathi 6 winner - Tanvi KolteImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 19, 2026 | 11:18 PM
Share

Bigg Boss Marathi 6 Winner : ‘बिग बॉस मराठी सिझन 6’ची धमाकेदार सुरुवात तीन महिन्यांआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. हा शो महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये एकूण 17 सदस्य 100 दिवस 100 कॅमेरांच्या नजरकैदेत राहिले. या घराने आणि महाराष्ट्राने सदस्यांमधील भांडणं, वाद-विवाद, मैत्री, भावनांचे उतार-चढाव आणि नात्यांचे बदलते रंग पाहिले. आता अखेर हा शंभर दिवसांचा रोमांचक प्रवास आज (19 एप्रिल 2026) संपन्न झाला. ‘बिग बॉस मराठी सिझन 6’चा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता तो क्षण शेवटी आला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकत घराघरांत पोहोचलेल्या या पर्वाचा भव्य समारोप होत, तन्वी कोलते हिने आपल्या दमदार आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर ‘महाविजेती’चा मान पटकावला.

अंतिम क्षणापर्यंत कायम असलेल्या उत्कंठेनंतर विजेतेपदाची घोषणा होताच संपूर्ण वातावरण जल्लोषात न्हाऊन निघालं. विजेत्याला कलर्स मराठीकडून तब्बल 15 लाख धनराशी आणि ट्रॉफी देण्यात आली. त्याचप्रमाणे पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे तब्बल 10 लाख रुपयांचं वाऊचर, रेवा डायमंडच्या सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी मिळालं. तुनवाल ई मोटर्सची लिथीनो प्रो ही ई बाइकसुद्धा विजेतीला देण्यात येणार आहे. तर रितेश देशमुख आणि राज शिवाजी चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर फोटोदेखील देण्यात आला.

विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली, “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मला सगळे घरात बोलत होते, विचारत होते काय काम केलंस, काय नावं तेव्हा वाईट वाटायचं. पण मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नावं असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं आहे, आले होते तन्वी कोलते म्हणून जाते आहे तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून.”

Follow Us
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश