Sai Lokur Wedding | शुभमंगल सावधान! अभिनेत्री सई लोकूर विवाहबंधनात

Sai Lokur Wedding | शुभमंगल सावधान! अभिनेत्री सई लोकूर विवाहबंधनात

‘मराठी बिग बॉस’ फेम आणि अभिनेत्री सई लोकूर विवाहबंधनात अडकली आहे.(Marathi Actress Sai Lokur Wedding tie knot with tirthadeep roy) 

Namrata Patil

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 07, 2020 | 3:33 PM

मुंबई : ‘मराठी बिग बॉस’ फेम आणि अभिनेत्री सई लोकूर विवाहबंधनात अडकली आहे (Actress Sai Lokur Wedding). गेल्या काही दिवसांपासून सईच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तीर्थदीप रॉय असे तिच्या जोडीदाराचं नाव आहे. मराठमोळ्या पद्धतीने सईने तीर्थदीपसोबत लगीनगाठ बांधली. (Marathi Actress Sai Lokur Wedding tie knot with tirthadeep roy)

सई आणि तिर्थदीप यांचा विवाहसोहळा बेळगावात पार पडला . सकाळी 9.54 वाजता ते दोघेही विवाहबंधनात अडकले. सईचं लग्न 30 नोव्हेंबरला असलं तरी आता लग्नघरी विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकतंच लग्नाआधीचं देवकार्य पार पडलं असून या कार्यक्रमाचे फोटो सईनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सईने शेअर केलेल्या या फोटोत तिचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे. नाकात नथ, केसात गजरा, गळ्यात मोत्यांची माळ, कपाळावर चंद्रकोर असा छान मराठमोळा लूक सईने केला आहे. सईनं लग्नापूर्वीच्या अनेक विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सई आणि तीर्थदीपचा साखरपुडा 2 ऑक्टोबर 2020 ला पार पडला होता. “माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे”, असं कॅप्शन सईने साखरपुड्यातील फोटोंना दिलं होतं. सईने साखरपुड्याला पिवळ्या आणि लाल रंगाचा लेहंगा घातला होता. तसेच, तीर्थदीपनेही पिवळ्या रंगाची शेरवानी घातली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

त्यापूर्वी सईने प्रेमात पडल्याची कबुली देत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. मात्र, तिचा जोडीदार पाठमोरा असल्याने, तो कोण असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती.

बिग बॉसच्या घरात रंगीली होती सई-पुष्कर मैत्रीची चर्चा

कलर्स मराठी वाहिनीचा ‘मराठी बिग बॉस’ (Bigg Boss) हा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. मराठी बिग बॉसचे पहिले पर्व, त्यातील स्पर्धकांमुळे खूपच चर्चेत आले होते. त्यातील एक स्पर्धक अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) हिनेदेखील या कार्यक्रमातून स्वत:चा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. स्पर्धेदरम्यान, ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात तिची मेघा धाडे, पुष्कर जोग यांच्यासोबत असलेली मैत्री देखील चांगलीच गाजली होती. विशेषतः सई लोकूर आणि पुष्कर जोग यांच्या मैत्रीची चर्चा बिग बॉसच्या घराबाहेर देखील चांगलीच रंगली होती

संबंधित बातम्या : 

Photo : करा हो लगीन घाई; सई लोकूरच्या लग्नाचं ‘देवकार्य’

PHOTO | अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांची अनोखी ‘डिजिटल लग्नपत्रिका’!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें