येत्या 30 नोव्हेंबरला बेळगावात सई लोकूर आणि तिर्थदीप विवाहबद्ध होणार आहेत.(Do it quickly; ‘Devakarya’ of Sai Lokur’s wedding)
1/6

अभिनेत्री सई लोकूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या 30 नोव्हेंबरला बेळगावात सई आणि तिर्थदीप विवाहबद्ध होणार आहेत.
2/6

लग्न 30 नोव्हेंबरला असलं तरी आता लग्नघरी विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकतंच लग्नाआधीचं देवकार्य पार पडलं असून या कार्यक्रमाचे फोटो सईनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/6

या कार्यक्रमासाठी सईनं छान केशरी ब्लाऊज आणि गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यासोबत गजरा आणि नथ तिच्या सौंदर्यात भर टाकत आहे.
4/6

या कार्यक्रमाच्या फोटोंमध्ये सई प्रचंड खूश दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांनासुद्धा चांगलाच आवडला आहे.
5/6

तिनं होणाऱ्या नवऱ्यासोबत मस्त फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसत आहे.
6/6

सईनं या फोटोंमध्ये आई-वडिलांसोबतचा फोटोसुद्धा शेअर केला आहे.