AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राकेशचा घटस्फोट आणि विशालचं वय… दोघांमध्ये चांगलीच जुंपली, संतापले बिग बॉस, Video व्हायरल

'बिग बॉस मराठी 6' शो दिवसागणिक अधिक रंगात येत आहे. आता फानयलमध्ये पोहोचण्यासाठी सर्वच स्पर्धक पूर्ण प्रयत्न करत असताना विशाल आणि राकेश यांच्यातील वाद टोकाला पोहोचले. यादरम्यान बिग बॉस देखील संतावले... सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राकेशचा घटस्फोट आणि विशालचं वय... दोघांमध्ये चांगलीच जुंपली, संतापले बिग बॉस, Video व्हायरल
Bigg Boss Marathi 6
| Updated on: Mar 30, 2026 | 1:53 PM
Share

‘बिग बॉस मराठी 6’ शो मध्ये तब्बल 80 दिवस घालवल्यानंतर सर्वच स्पर्धकांना फिनालेपर्यंत जाण्याचे वेध लागले आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ शो आता अंतिम टप्प्यावर असल्यामुळे अधिक रंजक झाला आहे… आता टॉप 5 पर्यंत कोण पोहोचणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. नॉमिनेशन्समध्ये स्वतःचं नाव येऊ नये म्हणून स्पर्धक पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. अशात एका टास्क दरम्यान, विशाल आणि राकेश यांच्यातील वाद टोकाला पोहोचले. सध्या सोशल मीडियावर शोचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. प्रोमो पाहिल्यानंतर आजच्या एपिसोडमध्ये कोणता आणि कोणाचा राडा होणार… याचा प्रेक्षक बांधू शकतात…

सांगायचं झालं तर, बिग बॉसने स्पर्धकांना एक टास्क दिला. ज्यामध्ये कोणत्या स्पर्धकाचं फिनालेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही, हा निर्णय स्पर्धकच घेणार होते… याचा टास्कचा प्रोमो कलर्स मराठीने पोस्ट केला आहे. टास्क सुरु असताना विशाल आणि राकेश यांच्यातील वाद त्यांच्या खासगी आयुष्यापर्यंत पोहोचतो. ‘ज्यांचा टीव्ही फुटणार, त्यांचं फिनालेला जाण्यातं स्वप्न तुटणार….’, या वाक्याने बिग बॉसच्या आवाजातील प्रोमोची सुरुवात झाली. बिग बॉसने स्पर्धकांनी नॉमिनेशन टास्क दिला.. त्यामध्ये स्पर्धकांना टीव्ही फोडायचा होता…

प्रोमोमध्ये राकेश बापट याच्या निर्णयाबद्दल दाखवण्यात आलं… नॉमिनेशन्समध्ये राकेश याने विशाल याचं नाव घेतलं. विशाल याचं नाव घेत राकेश म्हणाला, ‘मी विशालचं नाव घेतोय… तो लोकांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत असतो… या गोष्टी मला चुकीच्या वाटतात..’, यावर विशाल भडकतो आणि म्हणतो, ‘तू माझ्या वयाबद्दल बोलतो ते चालतं… ते पर्सनल नाही का? तुझा घटस्फोट झालाय…’, विशाल याचं हे वाक्य पूर्ण देखील होत नाही आणि तेवढ्यात राकेश देखील भडकतो आणि म्हणतो, ‘तू माझा घटस्फोट का काढतोय…’, त्यानंतर दोघांचे वाद टोकाला पोहोचतात. त्यांचं भांडण सोडवण्यासाठी अन्य स्पर्धक देखील पुढे येतात. अखेर बिग बॉसना मध्ये पडावं लागतं. संतापात बिग बॉस म्हणतात, ‘राकेश – विशाल लांब व्हा…’, सध्या प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे येत्या एपिसोडमध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Follow Us
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...