AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी असाच, मला पश्चात्ताप नाही.. व्यक्तीला कानाखाली मारल्यानंतर एल्विश यादवची प्रतिक्रिया

‘बिग बॉस ओटीटी 2’चं विजेतेपद पटकावणारा युट्यूबर एल्विश यादव सध्या त्याच्या एका व्हिडीओमध्ये वादात सापडला आहे. तो या व्हिडीओत रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या कानाखाली मारताना दिसतोय. यावरून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

मी असाच, मला पश्चात्ताप नाही.. व्यक्तीला कानाखाली मारल्यानंतर एल्विश यादवची प्रतिक्रिया
Elvish YadavImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2024 | 11:36 AM
Share

मुंबई : 13 फेब्रुवारी 2024 | ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा वादात अडकला आहे. सोशल मीडियावर एल्विशचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो एका रेस्टॉरंटमधील व्यक्तीच्या कानाखाली मारताना दिसत आहे. राजस्थानमधील जयपूर इथल्या एका रेस्टॉरंटमधील ही घटना आहे. व्हायरल व्हिडीओत दिसतंय की एल्विश पुढे चालत असताना अचानक मागे येतो आणि बाजूला बसलेल्या एका व्यक्तीला जोरात कानाखाली मारतो. यानंतर तिने मोठा वाद निर्माण होतो. एल्विश पुन्हा एकदा त्या व्यक्तीला मारायला जातो, पण यावेळी त्याला आजूबाजूचे लोक थांबवतात. एल्विशचा राग शांत करायचा ते प्रयत्न करतात. यादरम्यान एक पोलीस कर्मचारीसुद्धा तिथे येतो आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो. याप्रकरणी आता एल्विशने ऑडियोच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे.

एल्विश यादवचं स्पष्टीकरण-

आपल्या ऑडियो स्टेटमेंटमध्ये एल्विश म्हणतोय, “भाई, हे पहा.. विषय असा आहे की मला भांडण्याची हौस नाही आणि मला कोणावर हात उचलण्याचीही हौस नाही. मी माझ्या कामाशी काम ठेवतो. माझा मी ठीकच असतो. जे लोक फोटोची विनंती करतात, त्यांच्यासोबत उभा राहून मी शांतपणे फोटोसुद्धा काढतो. पण जो कोणी मागून कमेंट करतो आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ करतो, त्याला मी सोडत नाही. आमच्यासोबत त्याठिकाणी पोलीस आणि कमांडोससुद्धा होते. आम्ही काही चुकीची गोष्टी असं नाहीये. मात्र हे प्रकरण वैयक्तिक आहे. त्या व्यक्तीने माझ्यावर वैयक्तिक कमेंट केली आणि म्हणूनच मी त्याच्या कानखाली मारली. मला त्या गोष्टीचा कोणताच पश्चात्ताप नाही. मी असाच आहे. मी शिवीगाळ ऐकली आणि त्यावर माझ्या स्टाइलने प्रतिक्रिया दिली.”

एल्विशच्या व्हिडीओवर कमेंट करत काहींनी त्याची बाजू घेतली तर काहींनी त्याच्यावर टीका केली. एल्विशला कोणी काही बोललं असेल आणि त्यानंतर तो त्या व्यक्तीला मारायला मागे आला असेल, असं एकाने लिहिलं. तर एल्विशच्या डोक्यात विजयाची आणि प्रसिद्धीची हवा गेलीये, असं दुसऱ्याने म्हटलंय.

एल्विश यादवने बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती. असं असूनही तो या सिझनचा विजेता ठरला होता. युट्यूबर अभिषेक मल्हानला त्याने तगडी टक्कर दिली होती. बिग बॉसमध्ये त्याची आक्रमक खेळी चर्चेत राहिली आणि चाहत्यांकडूनही त्याला पाठिंबा मिळाला. मात्र शोमधून बाहेर आल्यानंतर तो सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत आला आहे. याआधीही त्याचं नाव विषारी सापांच्या तस्करीप्रकरणात समोर आलं होतं.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...