Bigg Boss OTT 2 | “मी हात जोडतो, ही ट्रॉफी घेऊन जा”; एल्विश यादवला का परत करायचीय बिग बॉसची ट्रॉफी?

वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेणारा एल्विश जवळपास 50 दिवसांपेक्षा अधिक काळ तिथे टिकून राहिला. याआधी वाइल्ड कार्डद्वारे आलेला कोणताच स्पर्धक विजेता ठरला नव्हता. एल्विशने प्रसिद्ध युट्यूबर अभिषेक मल्हान, अभिनेत्री पूजा भट्ट, मनीषा राणी, बेबिका धुर्वे यांना हरवलं.

Bigg Boss OTT 2 | मी हात जोडतो, ही ट्रॉफी घेऊन जा; एल्विश यादवला का परत करायचीय बिग बॉसची ट्रॉफी?
Elvish Yadav
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 5:30 PM

मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने ‘बिग बॉस ओटीटी 2’ या शोचं विजेतेपद जिंकलं होतं. मात्र शो जिंकल्यापासून तो विविध कारणांमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिग बॉसमुळे त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. देशभरात त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. मात्र त्याचसोबत विविध कॉन्ट्रोवर्सीमुळे तो सतत चर्चेत आहे. सध्या एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान हे दोघं युट्यूबर निगेटिव्ह पिआरमुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर या दोघांना टार्गेट केलं जात आहे. या दोघांनी एकमेकांविरोधातही वक्तव्य केली आहेत. त्यानंतर आता एल्विशने थेट बिग बॉसची ट्रॉफीच परत घेऊन जाण्याची विनंती केली.

एल्विश यादवचा नवीन व्लॉग चर्चेत

एल्विश यादवने त्याच्या नुकत्याच एका युट्यूब व्लॉगमध्ये सांगितलं की, बऱ्याच महिन्यानंतर त्याच्या घरी परतला आहे. या व्लॉगमध्ये तो त्याच्या आईसोबत वेळ घालवताना दिसतोय. त्यानंतर तो आईला विचारतो, “माझं सामान कुठे आहे?” सामानाबद्दल विचारतानाच तो त्याच्या रूममध्ये जातो आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’ची ट्रॉफी हातात घेतो. ही ट्रॉफी हातात घेतल्यानंतर तो पुढे म्हणतो, “याला परत घेऊन टाक भावा. मी ट्विटरवरील पोस्ट पाहिले आहेत.” त्यानंतर एल्विश ती ट्रॉफी त्याच्या आईच्या हातात देतो आणि आईला म्हणतो, “याला कुरिअर करून टाक आई. आमचा पाठलाग सोडून द्या. मी हात जोडतो. या सर्व वादाचं मूळ कारण ही ट्रॉफीच आहे.”

ट्रॉफी परत घेऊन जाण्याची विनंती

बिग बॉसच्या ट्रॉफीनंतर एल्विश आणखी एक डेकोरेटिव्ह पीस दाखवतो. ते त्याने बिग बॉसच्या घरातून आणलं होतं. ते सुद्धा परत घेऊन टाका अशी विनंती तो करतो. “मला बिग बॉसची एकही गोष्ट माझ्या घरात नको,” असं तो आईला म्हणतो. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी 2’चा रनरअप अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. या दोघांचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांसोबत भिडले. यादरम्यान अभिषेकनेही सोशल मीडियावर एल्विशच्या विजेतेपदावरून कमेंट केली होती.

हे सुद्धा वाचा

‘बिग बॉस ओटीटी 2’ हा शो जिंकल्यापासून एल्विशच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. म्युझिक व्हिडिओपासून ते चित्रपटांपर्यंत त्याला असंख्य ऑफर्स येत आहेत. नुकताच त्याने अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत एक म्युझिक व्हिडिओ शूट केला. त्यानंतर एल्विशने दुबईमध्ये स्वत:चं आलिशान घरदेखील खरेदी केलं आहे.

Non Stop LIVE Update
संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका, 'या' नेत्यानं काढली लायकी
संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका, 'या' नेत्यानं काढली लायकी.
आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?
आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?.
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन..
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन...
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?.
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून....
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं.