AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Thakare : सध्या भीतीचं वातावरण… शिव ठाकरेचा अविवाहित राहण्याचा निर्णय, मोठं वक्तव्य चर्चेत

Shiv Thakare : कोणी गडावरुन फेकतंय, कोणी ड्रममध्ये... फक्त मुलीचं नाही मुलं देखील..., शिव ठाकरे याने घेतलाय अविवाहित राहण्याचा निर्णय, अभिनेत्यांच भारतीय लग्न संस्थेबद्दल मोठं वक्तव्य

Shiv Thakare : सध्या भीतीचं वातावरण... शिव ठाकरेचा अविवाहित राहण्याचा निर्णय, मोठं वक्तव्य चर्चेत
Shiv Thakare
| Updated on: Aug 26, 2026 | 9:41 AM
Share

Shiv Thakare : शिव ठाकरे याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. शिव याने मराठी बिग बॉस सीझन 2 मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. आज शिव याचा प्रवास प्रत्येकाला माहिती आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज शिवा याने अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. पण लग्नाबद्दल शिव याचे विचार फार वेगळे आहेत. अनेक जण सुखी संसाराची स्वप्न पाहात असतात. पण शिव याला लग्नाची भीती वाटते नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत शिव याने सध्याची परिस्थिती आणि भारतीय लग्न संस्थेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या शिव याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर शिव याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अनेकांचा त्याला एकच प्रश्न असतो आणि तो म्हणजे ‘शिव लग्न कधी करणार?’, दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत देखील शिव याला लग्नाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा शिव याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

मुलाखतीत शिव म्हणाला, ‘मला लग्नच करायचं नाही. कोणी डोंगरावून फेकत आहे, तर कोणी ड्रममध्ये आहे… सध्या भीतीचं वातावरण आहे. फक्त मुलीच नाही तर, मुलं देखील असं करत आहेचत. भारतात आणि महाराष्ट्रात लग्न म्हणजे शुभमंगल सावधानपासून खोकल्याचं औषध शेअर करण्यापर्यंत एकत्र असं होतं… असं म्हटलं जातं की, लग्नाच्या पाच वर्षांनंतर जुळत नाहीच, हे सगळं पाहून लग्न न करण्याची मानसिकता झाली आहे.’

शिव पुढे म्हणाला, ‘असं नाही की मला लग्न करायचं नव्हतं, पण आता विचार बदलत आहेत. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांनाच नातं टिकवायचं आहे, मग ती नाती तोडणारी कोण आहेत? सगळ्यांना पार्टनरकडून प्रामाणिकपणा हवा असतो. मग चिटिंग कोण करतंय? जोडीदाराची गरज नक्कीच आहे. पण नातं तुटल्यानंतर घटस्फोट, दोन कुटुंबांना त्रास, कोणचं तरी मन दुखणं… या सगळ्या गोष्टींचा विचार केला की भीती वाटते.’ असं देखील लग्नाबद्दल शिव ठाकरे म्हणाला.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे