AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14| बिग बॉसच्या घरामध्ये जोरदार हंगामा!

बिग बॉस 14'  (Bigg Boss 14) कलर्स टीव्हीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आज बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळत आहे.

Bigg Boss 14| बिग बॉसच्या घरामध्ये जोरदार हंगामा!
| Updated on: Dec 09, 2020 | 7:03 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस 14’  (Bigg Boss 14) कलर्स टीव्हीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आज बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळत आहे. विकास गुप्ता आणि अर्शी खान यांच्यामध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहेत. बिग बॉसने घरातील सदस्यांना अगोदरच सांगितले आहे शारिरीक बळाचा वापर घरात करायचा नाही. मात्र, प्रोमोमध्ये दिसत आहे विकास गुप्ता आणि अर्शी खान दोघेही शारिरीक बळाचा वापर करत आहेत. यामुळे बिग बॉस या दोघांना काय शिक्षा देतात.(Bigg Boss’s house will see a strong arguments)

विकास गुप्ता या खेळाचे मास्टर माइंड मानले जाते. मात्र या हंगामात विकासची जादू दिसत नाही. तर दुसरीकडे, अर्शी खान वारंवार विकासाला लक्ष्य करताना दिसत आहे. खरं तर विकास गुप्ताला बिग बॉसने 5 आव्हाने दिले आहेत.

बिग बॉस घरातील सदस्यांना एक टास्क देतात. त्या टास्क वेळी एजाज खान कश्मिरा शहाला जोरदार ढकलतो. ज्यामुळे ती जमिनीवर पडते. हे पाहून रुबीना आणि जास्मीन एजाज खानला भांडताना दिसत आहेत. या घडलेल्या घटनेमुळे बिग बॉस टास्क थांबवायला सांगतात. मात्र, यानंतर हा टास्क कोण जिंकते हे पाहण्यासारखे ठरेल.

रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे दोघे नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार होते, असा धक्कादायक खुलासा रुबीनाने केला होता. ही गोष्ट रुबीनाने नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर शेअर केली होती आणि रूबीना सांगते की, मी आणि अभिनवने ऐकमेकांना नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला होता आणि हेच कारण होते की आम्ही बिग बॉसमध्ये आलो. हे सर्व सांगताना रूबीना रडताना दिसली होती. ‘इम्युनिटी स्टोन’ मिळवण्यासाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आपआपली रहस्ये उघड केली आहेत. मात्र इम्युनिटी स्टोन एजाज खानला मिळाला आहे. एकता कपूरने ‘इम्युनिटी स्टोन’ रूबीनाला दिला होता. ज्याच्या सहाय्याने रूबीना एकदा नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित राहु शकत होती. परंतु रुबीनाने अद्याप इम्युनिटी स्टोन वापरला नाही. बिग बॉसने रुबीनाला इम्युनिटी स्टोनचा वापर करण्याविषयी विचारले होते. मात्र, तिने इम्युनिटी स्टोन वापरण्यास नकार दिला होता.

अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | रुबिना दिलैक पाठोपाठ कविता कौशिकचा ‘बिग बॉस’वर गंभीर आरोप!

Bigg Boss 14 | बिग बॉस घरातील ‘व्हिलन’ ठरल्या रूबीना, निक्की आणि जास्मीन

(Bigg Boss’s house will see a strong arguments)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...