Birthday Special : रामायणाची जादू, प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल दिसताक्षणी लोक पाया पडायचे!

रामायण मालिकेतील अभिनेत्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. मालिकेतील अभिनेते लोकांना साक्षात देव वाटायचे. अभिनेते अरुण गोविल सार्वजनिक जीवनात वावरताना लोक थेट येऊन त्यांच्या पायाचं दर्शन घ्यायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. आज अरुण गोविल यांचा वाढदिवस आहे.

Birthday Special : रामायणाची जादू, प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल दिसताक्षणी लोक पाया पडायचे!
अरुण गोविल
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 3:06 PM

मुंबई : एकेकाळी भारतीय जनमाणसात रामायणाची जादू होती. टीव्हीवर रामायण लागलं की रस्ते, गल्ल्या ओस पडायच्या. सगळी माणसं टीव्हीच्या समोर बसायची. रामायण मालिकेतील अभिनेत्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. मालिकेतील अभिनेते लोकांना साक्षात देव वाटायचे. असंच प्रेम मालिकेतील प्रभू रामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते अरुण गोविल यांच्या वाट्याला आलं. अरुण गोविल सार्वजनिक जीवनात वावरताना लोक थेट येऊन त्यांच्या पायाचं दर्शन घ्यायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. या सगळ्या आठवणींना उजाळा द्यायचं कारण म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे. आज अरुण गोविल यांनी वयाची 64 वर्ष पूर्ण केलीयत आहेत.

उत्तर प्रदेशातील मेरठ विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी अरुण गोविल व्यवसायानिमित्त मुंबईत आले. पण त्याच काळात ते अभिनयाकडे आकर्षित झाले. त्याचदरम्यान, त्यांना रामायण मालिकेत प्रभू रामाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्यांनी साकारलेला राम लोकांच्या हृदयात एवढा बसला की अरुण गोविल यांनाच लोक साक्षात प्रभू रामाच्या रुपात पाहू लागले. देश असो वा परदेश, अरुण गोविल ज्या कार्यक्रमात जायचे, तिथे लोक त्यांच्या पायांना स्पर्श करुन त्यांचं दर्शन घ्यायचे, त्यांचे शुभाशिर्वाद घ्यायचे.

“सुरुवातीला मी अनेक चित्रपटांमध्ये साईड हिरोची भूमिका केली होती आणि त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन हाऊसने मला ‘सावन को अरुण आने दो’ या चित्रपटात ब्रेक दिला. त्यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला पण त्यांनी दूरदर्शनच्या आगामी ‘विक्रम और बेताल’ मध्ये साकारलेल्या महाराज विक्रमादित्यच्या भूमिकेने लोकप्रियता मिळवली.”

“मला रामानंद सागर यांना भेटण्याची संधी ‘विक्रम और वेताल’ मुळे मिळाली कारण ही मालिका त्यांचा मुलगा प्रेम सागर करत होता. मी त्याला भेटायला गेलो आणि त्याच्या अनेक स्क्रीन टेस्ट दिल्या. त्यावेळी रामायणासाठी ऑडिशन्स सुरू होत्या. रामानंद सागरजींनी मला सांगितले की लक्ष्मण किंवा भरतच्या भूमिकेसाठी आम्ही तुमची निवड करु. पण माझ्या मनात फक्त रामाची भूमिका होती पण मी त्यांना सांगितले नाही. नंतर तेच म्हणाले की, आम्हाला तुमच्यासारखा राम मिळणार नाही”, असं अरुण गोविल यांनी सांगितलं.

रामायणने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले. वर्षभरापूर्वी जेव्हा या शोचे रिपीट टेलिकास्ट लॉकडाऊनमध्ये चालले होते, तेव्हाही या शोला भरभरून लोकांचे प्रेम मिळाले होते. रामाची भूमिका साकारल्यानंतर अरुण गोविलचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. रामाची भूमिका साकारल्यानंतर अरुण गोविल यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले पण त्यांना त्यांची रामाची प्रतिमा पुसून टाकता आली नाही. पण या व्यक्तिरेखेने त्यांना वेगळी ओळख मिळाली.

संबंधित बातम्या

छोटी परी, सगळ्यांवर भारी, तिच्या तालावर नाचते दुनिया सारी

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची ‘कॉफी’ 14 जानेवारीला प्रदर्शित होणार

अभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.