छोटी परी, सगळ्यांवर भारी, तिच्या तालावर नाचते दुनिया सारी

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीची भूमिका करणारी बाल कलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिचे डायलॉग, तिचा डान्स सोशल मीडिया व्यापून टाकतो. अभिनयासोबतच तिचे रील्सही सोशल मीडियावर व्हायरल होतात.

छोटी परी, सगळ्यांवर भारी, तिच्या तालावर नाचते दुनिया सारी
मायरा

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परीची भूमिका करणारी बाल कलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिचे डायलॉग, तिचा डान्स सोशल मीडिया व्यापून टाकतो. स्क्रिनवरचा तिचा वावर अगदी सहज आणि तिच्या वयाला साजेसा असल्याने प्रेक्षकांच्या मनाचा तो ठाव घेतो. तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावताना दिसतोय. मायरा मालिकेतील इतर सहकलाकारांसोबत मजा मस्ती करतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत समीरची भूमिका करणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेसोबतची तिची केमेस्ट्री खास आहे. संकर्षणचा ‘मैने बोला था, मै कबसे बोल रहा हूँ जग्गू…’ हा डायलॉग दोघांनी एकत्र म्हटला आणि तो इन्साग्रामवर शेअर केला आणि त्या व्हीडिओला तुफान प्रतिसाद मिळाला.

मालिकेतल्या इतर कलाकारांनासोबतही तिची केमेस्ट्री भन्नाट आहे. मालिकेतील ‘सिम्मी काकू’ म्हणजेच अभिनेत्री शीतल क्षीरसागरसोबतचा एक व्हीडिओ तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती सीमाचा डायलॉग तिच्या स्टाईलमध्ये म्हणताना दिसतेय.

शेफाली म्हणजे अर्थात अभिनेत्री काजल काटेसोबतही तिचा एक व्हीडिओ तिने इन्टाग्रामवर पोस्ट केलाय. यात काजल आणि ती खेळात रंगलेल्या दिसत आहेत.

प्रार्थना बेहरेसोबतचे तिचे व्हीडिओ सोशल मीडियावर दिसतात. तिच्या अभिनयासोबतच तिचे रील्सही सोशल मीडियावर व्हायरल होतात. थोडक्यात काय तर परी आहे छोटी पण आपल्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांची मनं ती जिंकते आणि आपल्या तालावर दुनियेला नाचवते.

संबंधित बातम्या : 

अखेर…सिद्धार्थ दोन पाऊले मागे! सायना नेहवालवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्यांने मागितली माफी, वाचा काय होते संपूर्ण प्रकरण…

‘बाप तसा बेटा, नसीरुद्दीन शहांच्या मुलाच्या बाबतीत खोटं’, 20 व्या वर्षी करिअरला सुरुवात होऊनही अपयशी!

नाव किली पॉल. काम, नुसती Instagramवर हवा करायची भाव! आता ‘Saami Saami’वर ठेका धरलाय राव

Published On - 11:40 am, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI