‘बाप तसा बेटा, नसीरुद्दीन शहांच्या मुलाच्या बाबतीत खोटं’, 20 व्या वर्षी करिअरला सुरुवात होऊनही अपयशी!

मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचा मुलगा विवान शाह (vivaan Shah birthday) याचा आज वाढदिवस आहे. अभिनेता विवान शाह आज 32 वर्षांचा झालाय. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विवान त्याच्या वडिलांप्रमाणे उत्तम अभिनय करतो. डेहराडूनमधील प्रसिद्ध कॉलेज ‘द दून स्कूल’मधून त्याने पदवी घेतलीय. विवानने आपल्या करिअरची सुरुवात प्रसिद्ध दिग्दर्शक […]

'बाप तसा बेटा, नसीरुद्दीन शहांच्या मुलाच्या बाबतीत खोटं', 20 व्या वर्षी करिअरला सुरुवात होऊनही अपयशी!
विवान शाह
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 5:28 PM

मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचा मुलगा विवान शाह (vivaan Shah birthday) याचा आज वाढदिवस आहे. अभिनेता विवान शाह आज 32 वर्षांचा झालाय. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विवान त्याच्या वडिलांप्रमाणे उत्तम अभिनय करतो. डेहराडूनमधील प्रसिद्ध कॉलेज ‘द दून स्कूल’मधून त्याने पदवी घेतलीय. विवानने आपल्या करिअरची सुरुवात प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘सात खून माफ’ या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी विवान फक्त 20 वर्षांचा होता. मात्र वडिलांसारखं यश त्याच्या वाट्याला आलेलं नाही. म्हणूनच मराठीतील बाप तसा बेटा ही म्हण नसीरुद्दीन शहांच्या मुलाच्या बाबतीत आतापर्यंत तरी खोटी ठरलीय.

त्यानंतर विवान ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटात दिसला. या सिनेमात त्याला अभिषेक बच्चन, दीपिका पादुकोण, शाहरुख खान अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

विवानचे फ्लॉप चित्रपट

हॅपी न्यू इअरनंतर विवान ‘बॉम्बे वेलवेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. याशिवाय तो ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’, ‘कोटे’ आणि ‘जंक द कॉइन’ सारख्या चित्रपटांमधूनही त्याने छानसा अभिनय केला पण त्याचे हे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. विवान त्याच्या पर्सनल लाईफसाठीही खूप चर्चेत होता. विवान कमल हसनची मुलगी अक्षरा हसनचा चांगला मित्र आहे, त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. काही काळ दोघांच्या डेटिंगच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

विवान आता Zee5 च्या मालिकेत दिसणार

विवानने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांनंतर आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. तो आता Zee5 च्या ‘सटलियन’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या मालिकेत तो मुख्य कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विवान आणि शाहिद मावस भाऊ!

विवान आणि शाहिद मावस भाऊ आहेत. हे फार कमी लोकांना माहिती असेल. विवानची आई रत्ना पाठक शाह आणि सुप्रिया पाठक या सख्ख्या बहिणी आहेत. सुप्रिया पाठक ही शाहिदची आई आहे. विवान त्याचा मोठा भाऊ इमाद शाहच्या सर्वात जवळ असतो, दोघांचंही कनेक्शन खूप चांगलं आहे. सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो ते शेअर करत असतात. दोघांनाही एकच आणि एकत्र संगीत ऐकायला आवडतं. विवान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

संबंधित बातम्या-

फोटोग्राफर मानव मंगलानी यांचा सायना नेहवालला पाठिंबा, तर सिद्धार्थला कव्हर करणार नसल्याची घोषणा

विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची लेक वामिकाचा आज पहिला वाढदिवस, विरूष्काच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Lata Mangeshkar COVID | गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.