Birthday Special | 12 वर्षांनी मोठ्या गौहरला केले होते डेट, लग्नात अडथळा बनले धार्मिक कारण! वाचा अभिनेता कुशाल टंडनबद्दल…

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता कुशल टंडन (Actor Kushal Tondon) आपल्या मस्क्युलर बॉडी आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे लोकांच्या मनावर राज्य करतो. तो बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिकेतही झळकला आहे.

Birthday Special | 12 वर्षांनी मोठ्या गौहरला केले होते डेट, लग्नात अडथळा बनले धार्मिक कारण! वाचा अभिनेता कुशाल टंडनबद्दल...
कुशल टंडन

मुंबई : टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता कुशल टंडन (Actor Kushal Tondon) आपल्या मस्क्युलर बॉडी आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे लोकांच्या मनावर राज्य करतो. तो बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिकेतही झळकला आहे. कुशाल ‘बिग बॉस सीझन 7’मध्ये देखील दिसला होता. याच घरात त्याच्या प्रेमकथेचीही ही सुरुवात झाली होती. त्यावेळी कुशाल टंडन अभिनेत्री गौहर खानला डेट करत होता. दोघांनीही लग्न करण्याची योजना आखली आहे. परंतु, काही धार्मिक कारणांमुळे त्यांचे नातेसंबंध दुरावले. आज (28 मार्च) कुशल आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 मार्च 1985 रोजी त्याचा जन्म झाला होता. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपण त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया…(Birthday Special Actor Kushal Tondon break up with actress gauhar khan shocking reason)

बिग बॉस घरात वाढली होती गौहरशी जवळीक

अभिनेता कुशाल टंडन आणि त्याची एकस गर्लफ्रेंड अर्थात अभिनेत्री गौहर खान ‘बिग बॉस 7’ मध्ये एकत्र दिसले होते. येथूनच या दोघांच्या मैत्रीला सुरूवात झाली. हळूहळू त्यांची बाँडिंग वाढत गेली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांची केमिस्ट्रीही त्यांच्या चाहत्यांनाही बरीच आवडू लागली होती. त्यांच्या चाहत्यांनी या जोडीला ‘गौशाल’ असे नाव दिले होते. कुशाल गौहरपेक्षा तब्बल 12 वर्षांनी लहान होता, तरीही त्यांचे संबंध मात्र दृढ होते. दोघांनी एकमेकांना जवळपास 2 वर्षे डेट केले, परंतु पुढे त्यांचे संबंध फार काळ टिकले नाहीत. लवकरच त्यांचे हे नाते तुटले.

पाहा कुशालचे नवे फोटो :

 

View this post on Instagram

 

A post shared by KUSHAL TANDON (@therealkushaltandon)

(Birthday Special Actor Kushal Tondon break up with actress gauhar khan shocking reason)

कुशालने आपला धर्म बदलावा अशी गौहरची इच्छा होती!

गौहरशी ब्रेकअप झाल्यानंतर कुशाल टंडन खूप दु:खी झाला होता. यावेळी त्याने दिलेल्या मुलाखतीत आपल्या एका पत्रकार मित्राला सांगितले होते की, त्याच्या ब्रेक होण्याचे एकमेव कारण म्हणजे धर्म. गौहरची इच्छा होती की, त्याने हिंदू धर्म त्यागून मुस्लिम धर्म स्वीकारावा. तर, कुशालला धर्मांतर करायचे नव्हते. यामुळेच दोघांनी आपापले मार्ग वेगळे केले. कुशाल याच्या या वक्तव्याने बरीच खळबळ उडाली. यानंतर, त्याने आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, त्याच्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता. हे नाते दुभंगल्यामुळे त्याने हे कारण सांगितले होते.

सोशल मीडियावर केली होती ब्रेकअपची घोषणा!

कुशाल टंडनने गौहर खानशी ब्रेकअप करत असल्याचे आपल्या ट्विटर हँडलवरून जाहीर केले होते. त्यांच्या ब्रेकअपबद्दल सांगताना तो म्हणाला होता की, आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. कारण लोकांना वास्तविक जीवनातही त्यांना एकत्र पहायचे होते. जरी ब्रेकअपनंतर बरेच महिने दोघांनी एकमेकांशी बोलणे सोडले होते. परंतु, काही काळानंतर त्यांनी जुन्या गोष्टी विसरत, मैत्रीच्या नात्याला कायम ठेवले. त्यानंतर दोघांना बर्‍याच कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले होते. सध्या गौहर खानने डान्सर जैद दरबार याच्याशी निकाह केला आहे.

(Birthday Special Actor Kushal Tondon break up with actress gauhar khan shocking reason)

हेही वाचा :

Filmfare Awards 2021 | इरफान खानचा मरणोत्तर सन्मान, ट्रॉफी स्वीकारताना लेक बाबील झाला भावूक!

Filmfare Awards 2021: तापसीला ‘ब्लॅक लेडी’, इरफानचा मरणोत्तर सन्मान, फिल्मफेअर विजेत्यांची संपूर्ण यादी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI