AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गबाळा, सॉक्सचा उग्र वास, पण आत्मविश्वासपूर्ण… विश्वास नांगरे पाटील आणि रुममेट माधवनच्या मैत्रीचे किस्से

'मन में है विश्वास' या पुस्तकात नांगरे पाटलांनी माधवनसोबत मैत्रीचे किस्से सांगितले आहेत (Vishwas Nangare Patil R Madhavan)

गबाळा, सॉक्सचा उग्र वास, पण आत्मविश्वासपूर्ण... विश्वास नांगरे पाटील आणि रुममेट माधवनच्या मैत्रीचे किस्से
विश्वास नांगरे पाटील आणि आर माधवन
| Updated on: Mar 27, 2021 | 5:25 PM
Share

मुंबई : कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी यायचे. सांगलीतील छोट्याशा खेडेगावात राहणारे विश्वास नांगरे पाटीलही (Vishwas Nangare Patil) अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून राजाराम कॉलेजात आले. या कॉलेजमध्ये नांगरे पाटलांना रुममेट मिळाला तो प्रख्यात अभिनेता आर माधवन. (R Madhavan) ‘मन में है विश्वास’ या पुस्तकात नांगरे पाटलांनी माधवनसोबत मैत्रीचे किस्से सांगितले आहेत. (Vishwas Nangare Patil shares College memories with Roommate Bollywood Actor R Madhavan in book Mann Mein Hai Vishwas)

काय लिहिलं आहे विश्वास नांगरे पाटलांनी?

“राजाराम कॉलेजवर श्रीमंतांची मुलं अधिक असायची. त्यामुळे चारचाकी गाड्यांची वर्दळही अधिक. लेक्चरपेक्षा शामच्या चहाच्या गाडीवर गर्दी अधिक असायची. अकरावी-बारावीवेळी हॉस्टेलच्या वातावरणाचा माझ्यावर विपरित परिणाम झाला होता. आता मात्र हॉस्टेलमध्ये सावधान राहायचं हा निश्चय करुन हॉस्टेलला प्रवेश घेतला. हॉस्टेल म्हटलं, की टुकाऱ्या येतातच. वय असं असतं, की अपघात होतातच. चांगल्या वाईटाती गती सारखीच असते. काही जण अशा वाममार्गात चुकतात, काही भरकटतात आणि काही बेरके छुपे रुस्तम सगळ्या कसोट्यांवर तरुन उतरतात. यशस्वी होतात.” असं विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

त्याच्या सॉक्सचा खूप उग्र वास यायचा

“पुढे बॉलिवूडचा सुपरस्टार बनवलेला माधवन मला रुमपार्टनर अलॉट झाला होता. माधवन इंग्रजीमध्येच बोलायचा. खूप गबाळा आणि अस्ताव्यस्त राहायचा. त्याच्या सॉक्सचा खूप उग्र वास यायचा. रुममध्ये जायला, नको नको व्हायचं. पण मनाने स्वच्छ, आत्मविश्वासपूर्ण, देखण्या माधवनबरोबर माझी गट्टी जमली.” असं नांगरे पाटील सांगतात.

इंग्रजाळलेला मुलींचा ग्रुप माधवनच्या मागे

“कॉलेजवरचा इंग्रजाळलेला मुलींचा ग्रुप माधवनच्या मागे असे. तो त्यांच्या गराड्यात अनेकदा दिसायचा, पण माधवन सभ्य विद्यार्थी होता. त्याच्या बोलण्या-वागण्यात कधीही, कोणाबद्दल नकारार्थी दृष्टिकोन दिसला नाही. मुलींचा तो आदर करायचा. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, कँटीनमध्ये बसायचा, पण एखाद्या तेजस्वी योग्यासारखा.” अशा शब्दात नांगरे पाटलांनी मॅडीचं वर्णन केलं.

माधवनची एकतर्फी प्रेमातून भुरळ

“अनेक जणींना त्याच्या व्यक्तिमत्वाची एकतर्फी प्रेमातून भुरळ पडायची. तो कॉलेजवर वेगवेगळ्या नवनवीन संकल्पनांना अमलात आणायचा. आम्ही दोघेही एनसीसीमध्ये होतो. तो एनसीसीच्या यूथ एक्स्चेंज प्रोग्राममधून जपानला जाऊन आला. त्याचं वक्तृत्व आणि वादविवाद कौशल्य वादातीत होतं. तो हॉस्टेलमधल्या मुलांना एकत्र करुन इंग्रजीचे उच्चार शिकवायचा. थँक्यू बोलताना क चा अतिसूक्ष्म उच्चार कसा आवश्यक आहे, ते स्पष्ट उच्चार करुन शिकवायचा. पण आमच्या ताठर झालेल्या खेडवळ जिभा वळायच्याच नाहीत.” अशा शब्दात विश्वास नांगरे पाटील यांनी आर माधवनचं कौतुक केलं आहे.

“आम्ही दोघे डबलसीट सायकलवरुन मेसला जायचो. कानावर चार इंग्रजी वाक्य पडावीत, हाच उद्देश असायचा. ‘विकास धस नेहमी त्याची टर उडवायचा. काय रे माध्या, तुझ्या घरावरुन काय इंग्रजांचं विमान गेलं होतं का रे?’ माधवन अत्यंत संयमी होता. त्याने कधी विकासला उलट उत्तर दिलं नाही. याचा अर्थ विकासला तो घाबरत होता, असा नाही. माधवनच्या आयुष्याबद्दलच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या, त्याची स्वप्नं उत्तुंग आणि वेगळी होती. त्याच्या आचार-विचारांमध्ये सुसंगती होती. ध्येयाची जाणीव स्पष्ट होती. त्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमताही प्रचंड होत्या. त्याचे बाहू एवढे मजबूत आणि बळकट होते, की पंजा लढवण्याच्या शर्यतीत आमच्यापैकी एक जणही त्याच्यासमोर काही सेकंदांपेक्षा अधिक टिकायचा नाही. तरीही कोणत्याही गोष्टीमुळे माधवन चिडायचा नाही, उकसायचा नाही. त्यामुळे तो प्राध्यापकांच्या गळ्यातला ताईत झाला होता.” अशी आठवणही नांगरे पाटील यांनी लिहिली आहे. (Vishwas Nangare Patil shares College memories with Roommate Bollywood Actor R Madhavan in book Mann Mein Hai Vishwas)

कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना कॉलेजचा आदर्श विद्यार्थी कोण यासाठी बेस्ट राजारामीयन पुरस्कार दिला जात असे. यासाठी माधवन आणि विश्वास या दोघांची नावे आघाडीवर होती. यावेळी मात्र विश्वास नांगरे पाटलांनी बाजी मारली आणि मानाचा पुरस्कार पटकावला होता.

(साभार : ‘मन में है विश्वास’ – लेखक आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील)

विशेष म्हणजे, विश्वास नांगरे पाटील यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर खुद्द माधवननेही विश्वास नांगरे पाटलांच्या प्रामाणिक आणि न्यायप्रिय वर्तनाचं कौतुक केलं होतं.

संबंधित बातम्या :

जनरेशनला नावं ठेवताना बाबा कायम मोबाईलमध्येच, विश्वास नांगरे पाटलांच्या मुलीकडून ‘पोलखोल’

मित्रांना कोरोनाने गाठले, आमिर खानपाठोपाठ आर. माधवनलाही कोरोनाची लागण

(Vishwas Nangare Patil shares College memories with Roommate Bollywood Actor R Madhavan in book Mann Mein Hai Vishwas)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.