जनरेशनला नावं ठेवताना बाबा कायम मोबाईलमध्येच, विश्वास नांगरे पाटलांच्या मुलीकडून ‘पोलखोल’

जनरेशनला नावं ठेवताना बाबा कायम मोबाईलमध्येच, विश्वास नांगरे पाटलांच्या मुलीकडून 'पोलखोल'
विश्वास नांगरे पाटील यांची सहकुटुंब चला हवा येऊ द्यामध्ये हजेरी

विश्वास नांगरे पाटील घरात एकदम सॉफ्ट असतात, असं त्यांच्या पत्नीने सांगितलं. त्यावर बाहेर वर असलेल्या मिशा घरात खाली असतात, असं ते स्वतःच म्हणाले. (Vishwas Nangare Patil Family )

अनिश बेंद्रे

|

Jan 26, 2021 | 8:03 AM

मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात प्रजासत्ताक दिन विशेष सप्ताहानिमित्त सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलं होतं. वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, ज्येष्ठ कायदेज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने आणि ग्लोबल शिक्षक पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी उपस्थित होते. यावेळी नांगरे पाटलांच्या मुलांनी वडिलांचे धमाल किस्से सांगून रंगत आणली. आमच्या पिढीला बोलतात, मात्र ते स्वतःच मोबाईलवर वेळ घालवतात, असं विश्वास नांगरे पाटील यांच्या मुलीने सांगितलं. (Chala Hawa Yeu Dya IPS Officer Vishwas Nangare Patil Family Wife Daughter Son attends)

घरात मिशा खाली

‘चला हवा येऊ द्या’मध्ये प्रजासत्ताक दिन विशेष सप्ताहात उज्ज्वल निकम, डॉ. तात्याराव लहाने सपत्नीक उपस्थित होते. तर विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रुपाली, मुलगा रणवीर आणि कन्या जान्हवीही सेटवर हजर होते. सूत्रसंचालक डॉ. नीलेश साबळे यांनी नांगरे पाटलांच्या कुटुंबीयांशी गप्पा मारल्या. विश्वास नांगरे पाटील घरात एकदम सॉफ्ट असतात, असं त्यांच्या पत्नीने सांगितलं. त्यावर बाहेर वर असलेल्या मिशा घरात खाली असतात, असं ते स्वतःच म्हणाले.

‘जनरेशनला नावं ठेवताना कायम मोबाईलमध्ये’

‘घरात ते कायम मोबाईलवर असतात, काही विचारलं की.. उं? हं? असं करतात’ असं रुपाली नांगरे पाटील यांनी सांगताच उपस्थितांचे कान टवकारले. त्यानंतर विश्वास नांगरे पाटलांच्या कन्येने माईकचा ताबा घेतला. ‘जनरेशनला नावं ठेवताना कायम मोबाईलमध्येच असतात. त्यांना आमच्या जनरेशनशीच प्रॉब्लेम आहे, काही झालं की आम्हाला लहानपणी काहीच मिळालं नाही, मोबाईलमुळे सगळं सोपं झालंय, लायब्ररीमध्ये जा असं सांगतात’ असं जान्हवी म्हणाली.

आमच्या नशिबातच चिप्स नाहीत

‘बाबा बाहेर सिरीअस दिसत असले, तरी घरी खराब जोक मारतात’ असं जान्हवीने सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आमच्या घरात त्यामुळे आनंदी वातावरण असतं, असं सांगायलाही ती विसरली नाही. विश्वास नांगरे पाटील यांनी मात्र मिश्किल हसत मुलांच्या गोड तक्रारींवर बोलणं टाळलं. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात चिप्स असतात, आमच्या नशिबातच नाही, दोन-तीन वर्ष जंक फूड खाललं नाही, असं त्यांचा मुलगा रणवीरने सांगितलं.

कोरोना काळातील त्रिसूत्री

कोरोनाच्या काळात आम्ही व्यायाम, पुरेशी झोप-विश्रांती आणि सकस आहार अशी त्रिसूत्री पाळल्याचं नांगरे पाटील दाम्पत्याने सांगितलं. मुलांना दहा महिने आईस्क्रिम खाऊ न दिल्यामुळे ती नाराज आहेत. मात्र सर्दी खोकला किंवा कुठलेही संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिक पोलीस आयुक्तपदी असताना पोलिसांच्या आरोग्याची काळदी कशी घेतली, हेही त्यांनी सांगितलं. (Chala Hawa Yeu Dya IPS Officer Vishwas Nangare Patil Family Wife Daughter Son attends)

लव्ह मॅरेज की अरेंज?

विश्वास नांगरे पाटील यांचा विवाह 2000 मध्ये झाला. अरेंज मॅरेज की लव्ह असा प्रश्न नीलेश साबळेंनी विचारल्यावर पत्नीने पटकन ‘अरेंज’ असं उत्तर दिलं. त्यावर साखरपुड्यापर्यंत अरेंज होतं, नंतर सहा महिने मिळाल्याने लव्ह झालं, अशी खट्याळ प्रतिक्रिया विश्वास नांगरे पाटलांनी दिली.

23 वर्ष पोलीस सेवेत

अमिताभ बच्चन सारखी पर्सनॅलिटी असल्याचं मला सांगितलं जायचं. लहानपणी एनसीसीमध्ये असल्याने नंतर युनिफॉर्मची आवड निर्माण झाली. आयएएस व्हायची इच्छा होती, मात्र दोन वेळा आयपीएस रँकिंग मिळाली. माझ्या नशिबात तेच असावं. आता 23 वर्ष पोलीस सेवेत असताना कोणतीही खंत नाही, असंही नांगरे पाटलांनी सांगितलं.

हेही वाचा :

Special Story | मनोरंजन विश्वात ‘चला हवा येऊ द्या’ची हवा!

(Chala Hawa Yeu Dya IPS Officer Vishwas Nangare Patil Family Wife Daughter Son attends)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें