Birthday Special | पडद्यावरच्या सुप्रसिद्ध खलनायकाला सुरुवातीला मिळायचे केवळ 300 रुपये मानधन, वाचा प्रकाश राजबद्दल…

दाक्षिणात्य चित्रपटापासून करिअरची सुरूवात करणारे लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांचे चाहते आज जगभरात पसरले आहेत. त्यांनी कधी खलनायक बनून प्रेक्षकांना घाबरवले, तर कधी कॉमेडियन बनून लोकांना हसायला भाग पाडले.

Birthday Special | पडद्यावरच्या सुप्रसिद्ध खलनायकाला सुरुवातीला मिळायचे केवळ 300 रुपये मानधन, वाचा प्रकाश राजबद्दल...
प्रकाश राज
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 11:09 AM

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटापासून करिअरची सुरूवात करणारे लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांचे चाहते आज जगभरात पसरले आहेत. त्यांनी कधी खलनायक बनून प्रेक्षकांना घाबरवले, तर कधी कॉमेडियन बनून लोकांना हसायला भाग पाडले. नंतर त्यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर आपले वर्चस्व स्थापित केले. त्यांनी ‘सिंघम’ आणि ‘वांटेड’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. खऱ्या आयुष्यातील प्रकाश राज यांची कथा बरीच रंजक आहे. त्यांनी स्वतःच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान मुलीशी लग्नगाठ बांधली आहे. आज (26 मार्च) प्रकाश राज आपला 56वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या जीवनाशी संबंधित काही रंजक किस्से सांगणार आहोत…(Birthday Special story famous villain Prakash Raj struggle in industry)

कोरिओग्राफरशी केले लग्न!

View this post on Instagram

A post shared by Pony Verma (@ponyprakashraj)

बॉलिवूड आणि टॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या अभिनेता प्रकाश राज यांनी 12 वर्षांनी लहान असलेल्या कोरिओग्राफरबरोबर लग्न गाठ बांधली आहे. हे त्यांचे दुसरे लग्न होते. पोनी वर्मा असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. ‘द डर्टी पिक्चर’ या लोकप्रिय चित्रपटातील विद्या बालनच्या ‘उलाला उलाला’ या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन त्यांनीच केले आहे. राजने 2010मध्ये पोनीशी लग्न केले होते. वयाच्या 50व्या वर्षी त्यांना ‘पिता’ होण्याची संधी मिळाली. यापूर्वी 1994मध्ये त्यांनी अभिनेत्री ललिता कुमारशी लग्न केले होते. 2009मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.

सुरुवातीला मिळायचे केवळ 300 रुपये मानधन!

आजच्या घडीला प्रकाश राज हे सिनेमा जगातील एक सुप्रसिद्ध नाव असू शकते. परंतु त्यांना सुरुवातीच्या टप्प्यात खूप संघर्ष करावा लागला. ते आधी थिएटरमध्ये काम करायचे. स्टेज शोसाठी त्यांना महिन्याला फक्त 300 रुपये मिळायचे. प्रकाश यांनी कन्नड, तामिळ, मल्याळी, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे (Birthday Special story famous villain Prakash Raj struggle in industry).

दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून आडनाव बदलले!

प्रकाश राज यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘बिसिलू कुदुरे’ या टीव्ही कार्यक्रमातून केली होती. यानंतर त्यांनी कन्नड सिनेमातही काम केले. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती तामिळ चित्रपटांमधून… 1994मध्ये त्यांनी ‘ड्युएट’ चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यावेळी त्यांनी दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून आपले आडनाव बदलले. त्यांनी चित्रपटांसाठी प्रकाश रायऐवजी ‘प्रकाश राज’ असे नाव बदलून घेतले.

(Birthday Special story famous villain Prakash Raj struggle in industry)

हेही वाचा :

66th Filmfare Awards Nominations List | ‘तान्हाजी’, ‘थप्पड’, ‘पंगा’चा डंका, पुरस्कारात सुशांतलाही स्थान, पाहा संपूर्ण यादी!

Kapil Sharma : ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी सज्ज, नव्या कलाकारांचीही एन्ट्री होणार!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.