AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’ सिनेमामुळे इतिहास कळाला हे दुर्दैव; भाजप नेत्याने व्यक्त केली खंत

'छावा' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी राजे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला. पण भाजपच्या एका नेत्याने यावर खंत व्यक्त केली आहे.

'छावा' सिनेमामुळे इतिहास कळाला हे दुर्दैव; भाजप नेत्याने व्यक्त केली खंत
ChhaavaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 04, 2025 | 12:49 PM
Share

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ हा सिनेमा विशेष गाजला. संपूर्ण देशात सिनेमाने तुफान कमाई केली. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे. आता भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत बोलताना खंत व्यक्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगलीमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात छावा सिनेमामुळे इतिहास समजायला लागला याचे मला दु:ख होते असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, ‘छावा सिनेमामुळे इतिहास समजला हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या पिढीला सिनेमामधून इतिहास कळतोय. छत्रपती महाराजांचे अनेक किस्से आहेत. ते आत्ताच्या पिढीला माहीत नाहीत.’ वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया

पुढे शिवेंद्रराजे यांनी टीका करत म्हटले, ‘आज या महाराष्ट्राची धुरा एक जानता नेता देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. असे नेते महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यात हवे आहेत. त्याचे नेतृत्व राज्याचे आहे आणि आत्तापर्यंत झालेले नेते आपापल्या विभागापुरते मर्यादित होते.’

महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपतींसारखे शासन स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे आपण म्हणतो. हे कार्य आपणाला करायचे आहे. प्रायव्हसी हा विषय फार घातक आहे. आपण जे बोलतो ते मोबाईलमध्ये सेव होते. कायदा कडक झाला पाहिजे. कोण कुठेही बसून काही टाकू शकतो. समाजामध्ये तेढ निर्माण करू शकतो. कारक कोणीही काहीही टाकतो असे ते पुढे म्हणाले.

छावा सिनेमाविषयी

छावा हा सिनेमा मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात संभाजीची भूमिका विक्की कौशलने साकारली होती आणि त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.