AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाच्या ‘त्या’ एका वक्तव्याने पालटलं बॉबी देओलचं आयुष्य; बुडतं करिअर वाचवण्यासाठी केले पुन्हा प्रयत्न

बॉबी देओलने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने बरसात, सोल्जर, गुप्त : द हिडन ट्रुथ, बिच्छू यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2000 दशकाच्या मध्यात त्याला काम मिळणं कठीण होत गेलं. किस्मत, बरदाश्त, टँगो चार्ली, अलग, झूम बराबर झूम यांसारखे त्याचे चित्रपट फ्लॉप ठरले होते.

मुलाच्या 'त्या' एका वक्तव्याने पालटलं बॉबी देओलचं आयुष्य; बुडतं करिअर वाचवण्यासाठी केले पुन्हा प्रयत्न
Bobby Deol with his sonImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 31, 2023 | 6:58 PM
Share

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 | करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 8’ या चॅट शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल हजेरी लावणार आहेत. या शोमध्ये करणसोबत गप्पा मारताना बॉबी त्याच्या करिअरमधील सर्वांत कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याने बॉबीने व्यसनाधीन झाल्याची कबुली दिली. मात्र मुलाच्या एका वक्तव्यामुळे त्याने त्यातून बाहेर पडण्याचं ठरवलं.

“मी आशाच सोडली होती. मी स्वत:वरच दया करू लागलो होतो. त्यावेळी मला दारूचं व्यसन जडलं आणि मी दिवसभर घरीच बसून असायचो. लोक मला काम का देत नाही, असा सवाल करत मी स्वत:चीच कीव करत होतो. मी चांगला असतानाही त्यांना माझ्यासोबत का काम करायचं नाही, असा प्रश्न मला पडायचा. मी प्रत्येक गोष्टीबद्दल इतका नकारात्मक झालो होतो की कोणत्याच गोष्टीत मला सकारात्मक बाजू दिसत नव्हती. त्यावेळी माझी पत्नी काम करायची आणि मी घरीच बसायचो”, असं बॉबीने सांगितलं.

त्या कठीण काळात मुलाच्या एका वक्तव्याने बॉबीचं आयुष्य पालटलं होतं. याविषयी तो पुढे म्हणाला, “अचानक मी माझ्या मुलाला हे बोलताना ऐकलं की, आई.. पापा घरीच बसतात आणि तू रोज कामाला जाते. हे ऐकताच मला कसंतरी झालं. मी स्वत:लाच म्हणालो की नाही, मी अजून असं बसू शकत नाही. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मला वेळ लागला. हा बदल रातोरात झाला नाही.”

View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

“माझा भाऊ, वडील, आई, बहिणी.. हे सर्वजण माझ्या पाठिशी होते. पण तुम्ही सतत एखाद्याचा हात पकडून प्रत्येक गोष्ट करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या दोन पावलांवरच चालावं लागेल. हळूहळू गोष्टी बदलू लागल्या होत्या. मी माझ्या कामात अधिक लक्ष देऊ लागलो, अधिक गंभीरतेने गोष्टींकडे पाहू लागलो. मी लोकांची भेट घेऊ लागलो आणि त्यांच्याकडे काम मागू लागलो. मी तुझ्याकडेसुद्धा आलो होतो आणि आजपर्यंत तू माझ्यासोबत काम केलं नाहीस”, असं बॉबी करण जोहरलाही बोलून दाखवतो.

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.