अजानचा तो सूर अन् गायकाचा मोठा निर्णय, चौथ्या लग्नानंतर इच्छा पूर्ण…, खासगी आयुष्याबद्दल खुलासा
अजानचा सूर ऐकल्यानंतर गायकाने मोठा निर्णय घेतला आणि चैथ्या लग्नानंतर त्याची इच्छा पूर्ण झाली. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, गायकासोबत नेमकं झालं झालं काय? नुकताच झालेल्या एका ब्लॉगमध्ये गायकाने खासगी आयु्ष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक अदनान सामी याने अनेक गाणी गात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. गायकाबद्दल सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगायची झालं तर, पाकिस्तानच्या नागरिकत्वाचा त्याग करत, त्याने भारतीय नागरिकत्व स्वीकारलं. अदनान मुस्लीम धर्माला मानतो आणि अल्लाहने दाखवलेल्या मार्गावर चालतो. आपल्याकडून चांगलंच झालं पाहिजे… हाच विचार करतो… अदनान उमराहसाठी देखील गेलेला. मक्का – मदिना गेल्यानंतर आणि अजान ऐकल्यानंतर गायकाने एक इच्छा मनात ठेवली आणि चौथ्या लग्नानंतर गायकाची ती इच्छा पूर्ण देखील झाली. सांगायचं झालं तर, बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिच्या व्लॉगमध्ये अदनान याने मोठा खुलासा केला आहे…
मक्का-मदिनेत गेल्यावर अदनान याला असा एक भास झाला की, त्याने मुलांची नावेही त्याच अनुषंगाने ठेवली. याचा खुलासा अदनान याने फराह खानच्या व्लॉगमध्ये केला होता. सिंगरने सांगितलं की, तेव्हा त्याला कोणतंही मूल नव्हतं, परंतु पहिली अजान ऐकताच त्याच्या मनाला असा काही शांततेचा आणि सुखाचा अनुभव आला. एवढंच नाही, याच आधारावर अदनान याने मुलांची नावं ठेवण्याचा निर्णय घेतला.
अदनान याच्या घरातील प्रत्येक कोपरा…
अदनान याने फराह हिच्या व्लॉगमध्ये सांगितल की, गायक मक्का येथे गेलेला तेव्हा काबाच्या चादरीचा तुकडा तो घरी घेऊन आला आणि त्याची घरात फ्रेम करुन लावली. यावेळी अदनान याने त्याच्या मुलांच्या नावाचा देखील किस्सा सांगितला. जेव्हा गायकाने मक्का येथील अजान ऐकली, तेव्हा त्याच्या मनाला शांती लाभली आणि गायकाने मुलाचं नाव अजान आणि मुलगी झाल्यास तिचं नाव मदिना ठेवण्याचा निर्णय घेतला.
अदनान याचे 4 लग्न…
अजनान याचं पहिलं लग्न पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियार हिच्यासोबत झालेलं, त्यांना एक मुलगा देखील आहे आणि त्याचं नाव अजान आहे. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. तर गायकाचं दुसरं लग्न दुबईतील उद्योजिका सबा गलदारी हिच्यासोबत झालं. पण 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सबा आणि अदनान यांच्या नात्यात पुन्हा गुलाब बहरलं आणि दोघांनी लग्न केलं. पण नातं फार काळ टिकलं नाही.
त्यानंतर अदनान याने चौथं लग्न जर्मन – अफगान येथील मुळ रोया फरयाबी हिच्यासोबत लग्न केलं. 2010 मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. त्यानंतर दोघांनी गोंडस मुलीचं जगात स्वागत केलं आणि तिचं नाव मदीना असं ठेवलं..
