रीना, किरण, गौरी सोबत असलेल्या नात्यावर आमिर खानचं मोठं वक्तव्य, स्वतःला माततो किंग ऑफ रोमान्स!
Bollywood Actor Aamir Khan : रीना, किरण यांच्यासोबत घटस्फोट, गौरीसोबत करणार तिसरं लग्न? आयुष्यातील तीन महिलांबद्दल काय म्हणाला आमिर खान? स्वतःला म्हणतो 'किंग ऑफ रोमान्स'! आमिर खान कायम खासगी आयुष्यामुळे असतो चर्चेत...

Bollywood Actor Aamir Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आमिर खान याने दोन वेळा लव्हमॅरिज केलं पण अभिनेत्याचे दोन्ही लग्न फार काळ टिकलं नाही… आता आमिर खान गौरी नावाच्या महिलेला डेट करत आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. आता आमिर खान आणि गौरी यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. गौरी हिच्यासोबत लग्न करणार का? असे प्रश्न देखील आमिर खान याला विचारण्यात येतात.
नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात आमिर खान याला खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘शाहरुख खान याला किंग ऑफ रोमान्स म्हटलं जातं, पण खऱ्या आयुष्यात तो खरंच किंग ऑफ रोमान्स आहे का?’ यावर आमिर खान म्हणाला, ‘प्रत्येक व्यक्ती रोमँटिक असते… मी देखील आहे… मी स्वतःला भाग्यशाली मानतो, रीना दत्ता, किरण राव आणि गौरी… यांच्यासोबत माझे चांगले संबंध राहिले आहे…’
‘रीना 19 वर्षांची होती आणि मी 21 वर्षाचा होतो… आम्ही दोघे एकत्र मोठे झालोत… माझ्या यशामागे रीना हिचा मोठा वाटा आहे… आता गौरी हिला भेटून मी आनंदी आहे…’ पुढे घटस्फोटाबद्दल आमिर खान म्हणाला, रीना हिच्यासोबत घटस्फोट माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता…’
‘घटस्फोटानंतर जवळपास 4 वर्षा माझा कोणताच सिनेमा प्रदर्शित झाला नव्हता… दोन वर्ष मी काहीच काम केलं नाही… घरी मी एकटाच राहायचो…’ असं देखील आमिर खान म्हणाला. यावेळी आमिर खान याला, ‘प्रेमात सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे?’ असा प्रश्न देखील आमिर खान याला विचारण्यात आला.
यावर आमिर खान म्हणाला, ‘प्रेम ही एक तिव्र भावना आहे… प्रेम आणि शत्रुत्व एकमेकांच्या विरुद्ध आहे… द्वेष तुम्हाला थकवतो, तर प्रेम तुम्हाला आशा देते. प्रेम जीवनाला परिपूर्ण बनवतो. ती एक उपचारात्मक भावना आहे.’ असं देखील आमिर खान म्हणाल.
आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1986 मध्ये रीना दत्ता हिच्यासोबत लग्न केलं. रीना आणि आमिर यांना दोन मुलं देखील आहेत. आमिर आणि रीना यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2005 मध्ये आमिर याने किरण राव हिच्यासोबत लग्न केलं. किरण हिला देखील एक मुलगा आहे.
