AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खान याने दिली सेवाग्राम आश्रमाला भेट, म्हणाला, बापूंच्या विचारांचा…

अभिनेता आमिर खान याने मोठा काळ गाजवला आहे. आमिर खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे आमिर खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या मुख्य भूमिका या केल्या आहेत.

आमिर खान याने दिली सेवाग्राम आश्रमाला भेट, म्हणाला, बापूंच्या विचारांचा...
Aamir Khan
| Updated on: Jun 23, 2024 | 6:42 PM
Share

आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर आमिर खान हा गायब झाला होता. त्यानंतर लापता लेडीज चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आमिर खान दिसला. आमिर खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनेक हिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिली आहेत. मोठ्या संपत्तीचा मालक देखील आमिर खान आहे. आमिर खानची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. आमिर खान याची लेक इरा खान हिचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे.

नुकताच आमिर खान याने सेवाग्राम आश्रमाला भेट दिलीये. आमिर खान याने म्हटले की, सेवाग्राम आश्रमात प्रथमच आलो आहे. येथे प्रवेश करताच वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली. मी गांधीजींचा मोठा फॉलोअर आहे. बापूंच्या विचारांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. मला मोठा आनंद होत आहे की जिथे बापूजी दीर्घ काळ राहिलेत. ज्या गोष्टी त्यांनी वापरल्या त्या पाहून वेगळीच अनुभूती आली.

ते मी शब्दात सांगू शकत नाही. येथे येऊन मला मोठा आनंद झाला आहे. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला आमिर खान पोहचला होता. त्यावेळी त्याने आश्रमाला भेट दिली. बापू कुटी आणि परिसराची पाहणी करत माहिती देखील घेतली. आश्रमाच्या वतीने सूतमाळेने स्वागत आमिर खान याचे करण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच आमिर खानची एक्स पत्नी किरण राव हिने तिच्या आणि आमिर खान नात्याबद्दल मोठे भाष्य केले होते. घटस्फोटाबद्दल बोलताना किरण राव म्हणाली होती की, मी माझा संपूर्ण वेळ घेतला होता. यामुळेच मला काही काळजी नव्हती. मुळात म्हणजे मी आणि आमिर दोघेही खूप जास्त मजबूत आहोत.

आमचे नातेही मजबूत आहे. आम्ही एकमेकांशी खूप जास्त जोडले गेलेलो आहोत. आम्ही एकमेकांचा खूप आदर देखील करतो. आमच्या नात्याला एक स्पेस हवा होता आणि आम्ही तो घेतला मला काही गोष्टींमध्ये स्वत:ची प्रगती करायची होती. विशेष म्हणजे माझ्या निर्णयात आमिरनेही साथ दिल्याचे किरण राव हिने म्हटले होते.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...