ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या घटस्फोटावर अखेर अभिषेक बच्चन याचा मोठा खुलासा, थेट म्हणाला, लग्न…

Aishwarya Rai and Abhishek Bachchan divorce : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन तूफान आपल्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. यांच्या घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, आता त्यावर बोलताना अभिषेक बच्चन हा दिसतोय. अमिताभ बच्चन हा याचे बोलणे ऐकून आता विविध चर्चा या सुरू झाल्या आहेत.

ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या घटस्फोटावर अखेर अभिषेक बच्चन याचा मोठा खुलासा, थेट म्हणाला, लग्न...
Abhishek Bachchan and Aishwarya Rai
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 11:58 AM

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सतत त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे तूफान चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सांगितले जात आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार आहे. तसा खुलासाही काही रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे सांगितले जातंय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबासोबत नाही तर मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्न केले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच मुलीसोबत विदेशात जाताना ऐश्वर्या राय दिसली.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सतत चर्चा आहे. मात्र, इतके दिवस यावर भाष्य करताना कोणीही दिसले नव्हते. आता घटस्फोटाच्या चर्चांवर थेट अभिषेक बच्चन याने भाष्य केले आहे. अभिषेक बच्चन याने यूके मीडियाला एक मुलाखत दिलीये. यावेळीच तो ऐश्वर्या हिच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला.  

घटस्फोटाच्या प्रश्नावर बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला की, मुळात म्हणजे मला याबद्दल तुम्हाला काही बोलायचे नाहीये…खरोखरच ही वाईट गोष्ट आहे की, तुम्ही सर्वांनी या गोष्टीला खूप जास्त वाढून टाकले आहे. तुम्ही हे सर्व का करत आहात हे मला माहिती आहे. तुम्हाला काही गोष्टी प्रविष्ट कराव्या लागतात.

माफ करा…पण मी असून लग्नाच्या बंधनात आहे…यावेळी आपल्या हातातील अंगठी दाखवतानाही अभिषेक बच्चन हा दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी सकाळी व्हायरल होताना दिसला. मात्र, त्यानंतर हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून डिलीट करण्यात आला. पहिल्यांदाच घटस्फोटाच्या चर्चांवर बोलताना अभिषेक बच्चन हा दिसलाय. अभिषेक बच्चन याचा काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसला. त्यामध्ये तो घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला होता.

अभिषेक बच्चन याचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले. मात्र, त्यानंतर स्पष्ट करण्यात आले की, तो डीपफेक व्हिडीओ आहे. अभिषेक बच्चन हा पॅरिसमध्ये आपल्या भारतीय खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी पोहोचला होता. यावेळी अनेकांनी विचारले की, ऐश्वर्या राय कुठे आहे. ऐश्वर्याही विदेशात जाताना दिसली होती. मात्र, तिच्यासोबत अभिषेक बच्चन हा नव्हता.

फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'.
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा.