ऐश्वर्या रायच्या ‘या’ गोष्टीचा अभिषेक बच्चनला प्रचंड तिरस्कार, तोंडावरच म्हणाला, माझी पत्नी..
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय दिसते. मुलाखतीमध्ये अभिषेक याने थेट ऐश्वर्याबद्दल भाष्य केले.

अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अभिनेत्रीने मोठा काळ बॉलिवूड गाजवाय. मात्र, मागील काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या सुरू असल्याचे बघायला मिळतंय. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. अभिषेक चक्क ऐश्वर्या राय हिच्या न आवडत्या सवयींबद्दल थेट बोलला आहे. अभिषेकचे बोलणे ऐकून ऐश्वर्या राय हिच्या चेहऱ्यावरील रंगच उडाल्याचे बघायला मिळाले.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे करण जोहरच्या शोमध्ये पोहोचले होते. त्यावेळी अभिषेक बच्चनला करणे जोहरने विचारले की, पत्नींना पतीबद्दल कोणत्या गोष्टी माहिती नाही पाहिजे. यावर अभिषेक म्हणतो की, मला नाही माहिती पण…पत्नींना हे माहिती पाहिजे की, त्यांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीवर ज्ञान दिले नाही पाहिजे.
यावर करण जोहर हा अभिषेकला थेट विचारतो की, तुला ऐश्वर्या रायची कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही. यावर अभिषेक बच्चन म्हणाला की, ती ऑर्गनाइज्ड नाही राहत. ती नीट नेटके राहत नाही. अभिषेक बच्चन याचे हे बोलणे ऐकून ऐकून ऐश्वर्या राय हिला धक्का बसल्याचे तिच्या चेहऱ्यावरूव स्पष्ट दिसत आहे. आणि तिच्या चेहऱ्याचा रंग उतरतो. ऐश्वर्याच्या वाईट सवयींबद्दल थेट बोलताना अभिषेक बच्चन हा दिसलाय. तसा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा हा व्हिडीओ जुना आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू असताना त्यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. हेच नाही तर अभिषेक बच्चन याचे नाव दुसऱ्याच एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. मागील काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही विदेशात देखील एकटीच फिरताना दिसली आहे. अनेकदा ऐश्वर्याला अभिषेक कुठे आहे, असा थेट सवाल देखील विचारला जातो. ऐश्वर्या राय ही आज कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. अभिषेकच्या अगोदर ऐश्वर्या सलमान खानला डेट करत.
