40 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत गोविंद यांचे प्रेमसंबंध! ‘तो’ फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

Govind Namdev on Personal Life: 'वृद्ध म्हातारपणी भरकटतात...', 40 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत गोविंद यांच्या रिलेशनशिपची चर्चा, नक्की काय आहे सत्य? सध्या सर्वत्र गोविंद नावदेव यांच्या खासगी आयुष्याची चर्चा

40 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत गोविंद यांचे प्रेमसंबंध! तो फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण
फाईल फोटो
| Updated on: Jun 12, 2025 | 11:26 AM

Govind Namdev on Personal Life: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते गोविंद नामदेव यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज देखील त्यांचे अनेक सिनेमे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पण आता गोविंद नामदेव त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. 40 वर्ष लहान अभिनेत्री शिवांगी वर्मा हिच्यासोबत गोविंद नामदेव यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

रंगणाऱ्या चर्चांवर मौन सोडत गोविंद नामदेव यांनी अभिनेत्रीचा प्रमोशनल स्टंट असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, शिवांगी हिने सोशल मीडियावर गोविंद नामदेव यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. इन्स्टाग्रामवर शिवांगी हिने एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत शिवांगी म्हणते, ‘कोणी तरी खरंच सांगितलं आहे… वृद्ध म्हातारपणी भरकटतात…’ , अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर चर्चांना आणखी उधाण आलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टला नेटकरी गोविंद नामदेव यांच्याशी जोडू लागले आहेत.

गोविंद नामदेव आणि शिवांगी वर्मा यांचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. रंगणाऱ्या चर्चांवर गोविंद नामदेव यांनी देखील मोठा खुलासा केला आहे. ‘व्हायरल होत असलेला फोटो आगामी ‘गौरीशंकर गोहरगंज’ सिनेमाच्या प्रमोशन कँपेनचा एक भाग आहे.’

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि शिवांगी वर्मा यांच्यासोबत बैठका झाल्या. ज्यामध्ये प्रमोशनसाठी अनेक युक्त्या सुचवण्यात आल्या. गोविंद नामदेव यांनी फक्त सिनेमाच्या प्रमोशनसाठी होकार दिलेला. अशात शिवांगी हिने गोविंद नामदेव यांना न कळवता अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. ज्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.

रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर गोविंद नामदेव यांच्या वैवाहिक आयुष्यात देखील मोठं संकट आलं आहे. गोविंद नामदेव आणि पत्नी विभक्त झाल्याच्या चर्चांनी जोर धरला असून घटस्फोटाच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही… असं गोविंद नामदेव यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंद नामदेव यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

 

शिवांगी वर्मा हिने आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका बजावली आहे. सोशल मीडियावर देखील शिवांगी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.