बॉलिवूडवर कोरोनाचं सावट, अक्षय कुमार पाठोपाठ गोंविंदाही कोरोना पॉझिटिव्ह

खिलाडी कुमार अक्षय पाठोपाठ आता गोविंदा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वारंटाईन असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बॉलिवूडवर कोरोनाचं सावट, अक्षय कुमार पाठोपाठ गोंविंदाही कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : बॉलिवूडवर कोरोनाचं सावट वाढताना पाहायला मिळत आहे. खिलाडी कुमार अक्षय पाठोपाठ आता गोविंदा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वारंटाईन असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोविंदाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. ‘मोठ्या सावधगिरीनंतरही गोविंदा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत आणि ते होम क्वारंटाईन’, अशी माहिती गोविंदाच्या प्रवक्याने दिलीय. (Bollywood Actor Govinda corona Positive)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गोविंदा यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. सध्या ते होम क्वारंटाईन असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु आहे. गोविंदाची पत्नी सुनिता काही आठवड्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. आता त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. पण गोविंदा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गोविंदा यांनी संपर्कातील लोकांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलंय.

अक्षय कुमारला कोरोनाची लागण

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. “आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. Back in Action Very Soon,” असे ट्वीट अक्षय कुमार याने केले आहे.

रामसेतूच्या शुटींगला सुरुवात

दरम्यान अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर असलेल्या राम-सेतू या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली होती. या चित्रपटात अक्षय पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक त्याने नुकतंच शेअर केला होता. माझ्यासाठी सर्वात खास चित्रपट बनवण्याचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. राम सेतुचे शुटिंग सुरू! मी चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. माझ्या या लूकवर आपले विचार ऐकायला मला आवडतील…हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहे.’ अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर केली होती.

राम सेतू हा चित्रपट अभिषेक शर्मा दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिसही दिसणार आहे.

संबंधित बातम्या :

महेश भट, सुबोध भावे ते अमोल कोल्हे, मुख्यमंत्र्यांशी संवादात टीव्ही-चित्रपट निर्मात्यांचा महत्त्वाचा निर्णय

Akshay Kumar Corona | Back in Action Very Soon! बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

Bollywood Actor Govinda corona Positive

Published On - 4:17 pm, Sun, 4 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI